शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. महात्मा गांधी
Written By
Last Modified: शनिवार, 2 ऑक्टोबर 2021 (16:53 IST)

महात्मा गांधी: साबरमती कारागृहातल्या बंदीजनांसाठी गांधी आजही जिवंत

अहमदाबाद येथील साबरमती आश्रमापासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या साबरमती मध्यवर्ती कारागृहात बंदीजनांसाठी मंदिर आहे.साबरमती कारागृहातली ही विशेष कोठडी उत्सुकता जागवते.
 
साबरमतीच्या मध्यवर्ती कारागृहात महात्मा गांधींनी 10 दिवस कारवास भोगला होता. त्यांना 11 मार्च 1922 ला अटक झाली होती.
 
या कारागृहातील 10 बाय 10 फूटांच्या या कोठडीत गांधींना ठेवण्यातं आलं होतं.
भारतात त्यांना झालेली ही पहिली अटक होती.
 
"या कोठडीनजीक सकारात्मक भावनांचा अनुभव येतो, या कोठडीनजीक गांधींच अस्तित्व जाणवतं," असं मत इथल्या बंदीजनांच आहे.
 
या कोठडीचं नामकरण 'गांधी खोली' असं करण्यातं आलं आहे. बंदीजन इथं दररोज सकाळ संध्याकाळ दिवाबत्ती करतात.
या कारागृहात जन्मठेप भोगलेले नरेंद्रसिंह म्हणतात, "गांधी यार्ड हा असा परिसर आहे, जिथं मी चित्रं काढण्यासाठी जात होतो."
ते म्हणाले, "या ठिकाणी मी सकारात्मक चेतनांचा अनुभव घेतला आहे."
 
बंदीजनांची आवडती जागा
शिक्षा भोगून झाल्यानंतर नरेंद्रसिंह नवं आयुष्य जगत आहेत.
 
ते म्हणतात, "गांधी शरीरानं आपल्यात नसले, तरी इथल्या बंदीजनांसाठी मनानं मात्र ते इथंच आहेत."
 
साबरमती मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक आणि आय. पी. एस. अधिकारी प्रेमवीरसिंग यांनी या मंदिरासंदर्भात प्रतिक्रिया दिली.ते म्हणाले, "गांधी खोलीनजीक असताना काहीतरी वेगळं अनुभवता येतं. म्हणूनच कारगृहातील बंदीजनांना इथ वेळ घालवावा असं वाटतं."या कारगृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले जयराम देसाई गांधींची तुलना परमेश्वराशी करतात.
 
ते म्हणाले, "परमेश्वर मंदिरात असतो की नाही हे आम्हाला माहीत नाही, पण या ठिकाणी गांधी एकेकाळी राहिले आहेत."ते म्हणतात, "मला त्यांच अस्तित्व आजही जाणवतं, म्हणून मी दररोज इथं दिवा लावतो आणि नमस्कार करतो. मला इथं बरं वाटतो."

अनेक वर्षांची परंपरा
विभाकर भट्ट साबारमती मध्यवर्ती कारागृहात गेली 33 वर्ष संगीत शिक्षक म्हणून काम करतात.
 
ते म्हणाले, "या कोठडीत केव्हापासून दिवाबत्ती करतात, याची कल्पना नाही."
 
"पण जेव्हापासून मी इथं आहे, तेव्हापासून या खोलीत दिवाबत्ती केली जात असल्याचं मी पाहतो."
 
साबरमती मध्यवर्ती कारागृहात सरदार वल्लभाई पटेल यांनाही स्वातंत्र्य लढ्यात अटक झाल्यानंतर या कारगृहात ठेवण्यातं आलं होतं.या कारागृहात गांधी खोलीच्या बाजुलाच 'सरदार यार्ड' आहे.