1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: मंगळवार, 11 जून 2024 (13:28 IST)

मनोज जरांगेंची प्रकृती खालावली

गेल्या आठ जून पासून मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सुरु केले असून आता मात्र त्यांची प्रकृती खालावली आहे. बेमुदत उपोषण मराठा आरक्षण करीत करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांची तब्येत खालावली आहे. तर डॉक्टरांचे उपचार घेण्यास त्यांनी नाही सांगितले आहे. त्यांनी उपोषणाला ८ जून पासून सुरवात केली. 
 
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून यासाठी मोठा लढा मनोज जरांगे पाटलांनी उभारला. तसेच राज्यसरकारने आंदोलनाची दखल घेत स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी मराठा समाजासाठी देण्यात आली. पण 
मनोज जरांगेंनी ओबीसीमधूनच मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी करत ते ठाम आहे. म्हणून त्यांनी उपोषणाला सुरुवात आंतरवली सराटी येथे केली. पण मात्र आता त्यांची प्रकृती खालावली आहे व त्यांनी उपचार घेण्यास मनाई केली आहे. 

Edited By- Dhanashri Naik