मंगळवार, 21 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: बुधवार, 25 सप्टेंबर 2024 (10:24 IST)

मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली

Maratha activist Manoj Jarange
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली. मराठा समाजाला इतर मागासवर्गीय प्रवर्गातून आरक्षण मिळावे अशी मागणी करत त्यांचे उपोषण सुरु आहे. जालन्यातील अंतरवली सराटी येथे मराठा समाजाचे कार्यकर्त्यांना आवाहन करत त्यांनी औषध घेण्यास नकार दिला आहे. 

जरांगे यांचे मराठा आरक्षणासाठी उपोषण 17  सप्टेंबर पासून सुरु आहे. वर्षभरात हे त्यांचे सहावे उपोषण आहे. त्यांची मंगळवारी रात्री तब्बेत खालावली. त्यांना उपचार देण्यासाठी वैद्यकीय पथके तयार आहे.त्यांनी कोणतेही उपचार घेण्यास नकार दिला मात्र मराठा समाजाच्या दबाबामुळे त्यांना डॉक्टरांनी सलाईन लावली आहे.  

जरांगे यांची तब्बेत मंगळवारी रात्री खालावली पाहता आंदोलकांनी धुळे-सोलापूर आणि जालना- वडीगोदरी मार्ग रोखला. आंदोलन चिघळू नये या साठी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना उपचार घेण्यास विनंती केली आणि त्यांना सालीं लावण्यात आली असून त्यांच्यावर उपचार सुरु झाले आहे. 
 
मराठा समाजाला सगे सोयरे कुणबी म्हणून जाहीर करून ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे अशी मागणी मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.तसेच याला विरोध म्हणून ओबीसी समाजा कडून ओबीसींचे कार्यकर्त्ये लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे वडीगोद्री गावात आंदोलन करत आहे. 
Edited By - Priya Dixit