मंगळवार, 19 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: मंगळवार, 29 सप्टेंबर 2020 (12:57 IST)

मराठा आरक्षणाच्या मुदयावर संभाजीराजे आणि उदयनराजे एकत्र येणार?

Maratha Reservation
खासदार संभाजीराजे यांच्या उपस्थितीत नाशिक येथे मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक झाली. यावेळी संभाजीराजे यांनी उदयनराजे यांच्या बहीणीची भेट घेतली.  
 
मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्याने राज्यभर मराठा संघटनांची आंदोलनं सुरू आहेत. पण या संघटनांमध्येही नेतृत्त्वावरून वाद असल्याचे समोर आले. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी मनिषाराजे यांची भेट घेतल्याचे समजते.
 
मराठा आरक्षणासाठी सर्व संघटनांनी एकत्र येण्याचे आवाहन संभाजीराजे यांनी केले. त्यासाठी काही जबाबदाऱ्या ठरवायच्या असतील तर निश्चित करू असंही ते म्हणाले.
 
3 ऑक्टोबरला पुण्यात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मंथन बैठक होणार आहे. यासंबंधी चर्चेसाठी आमदार विनायक मेटे यांनी नुकतीच सातारा येथे उदयनराजे यांची भेट घेतली होती. "मराठा समाजाला आरक्षण देता येत नसेल तर, सगळेच आरक्षण रद्द करा." असे वक्तव्य यावेळी उदयनराजे यांनी केले होते.