शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Updated :मुंबई , सोमवार, 19 सप्टेंबर 2016 (16:27 IST)

महाराष्ट्रात जोर पकडत आहे मराठा आंदोलन

महाराष्ट्रात मराठा आंदोलनाने परत जोर पकडला आहे. बर्‍याच राज्यांमध्ये महाआंदोलनाची सुरुवात झाली आहे. लाखोंची गर्दी बघून  राजनैतिक पक्षांचे होश उडाले आहे. महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्ये मराठा रस्त्यावर उतरले आहे, यात मोठ्या संख्येत महिला, शाळेकरी मुली, मराठा समाजाचे युवा आणि वृद्ध सामील आहे.  
 
रागात आहे मराठा !
या मराठा आंदोलनाचे नेतृत्व कुठलेही पक्ष करत नाही आहे. तरी देखील यात लाखो लोक सामील होत आहे. महाराष्ट्रात सर्वात पहिला  मराठ्यांचा मोर्चा मराठवाडाच्या औरंगाबादमध्ये निघाला. येथूनच याची सुरुवात झाली आणि आता या आंदोलनाची आग संपूर्ण राज्यात पसरत आहे.  
 
मराठा समाज अहमदनगर जिल्ह्याच्या कोपर्डीतील एक मराठा समाजाच्या अल्पवयीन मुलीबरोबर झालेला बलात्कार आणि हत्येचा विरोध करत आहे. येथे आरोपी दलित समाजाचे होते. या मराठा आंदोलनकार्‍यांच्या तीन मोठ्या मागण्या आहेत. 
 
पहिली मागणी - कोर्पर्डी बलात्कार आणि हत्येच्या आरोपींना फाशीची शिक्षा  
दुसरी मागणी - एट्रॉसीटी कायदा रद्द करण्यात यावा   
तिसरी मागणी - मराठा समाजाला शिक्षा आणि नोकरीत आरक्षण देण्यात यावे. 
मराठा आंदोलनाच्या मागे कोण  
 
मराठा आंदोलनाच्या मागे कोण आहे. याचे सत्य काय आहे. कोणी यामागे एनसीपी मुख्य शरद पवार यांचे डोकं आहे तर कोणी  आध्यात्मिक गुरु भैय्यू महाराज यांना सांगत आहे. तर कोणी याला फडणवीस सरकारच्या विरोधींचे काम सांगत आहे.  
 
खरं तर हे आहे की मराठा आंदोलनाने सर्व पक्षांची झोप उडवली आहे. या आंदोलनाचा शेवटचा टप्पा मुंबईत असेल, जेथे 25 लाख मराठांना जमा करण्याची तयारी आहे. 9 ऑगस्टला औरंगाबादमध्ये मराठा समाजाचा सर्वात पहिला मोर्चा काढण्यात आला होता. असे सांगण्यात येत आहे की या मोर्च्यात पाच लाखांपेक्षा जास्त मराठा सामील झाले होते. उस्मानाबाद, जळगाव, बीड, परभणी या सर्व जागांवर लाखो मराठा रस्त्यावर उतरले होते.  
 
औरंगाबादमध्ये कोपर्डी बलात्कार आणि हत्येच्या विरोधात मोर्चा काढण्यासाठी सर्वात पहिली बैठक 22 जुलै रोजी सिंचाई भवनात झाली होती. या बैठकीत 16 लोक सामील झाले होते. विजय काकडे नावाच्या एका व्यक्तीने सांगितले की या बैठकीत कुठल्याही राजनैतिक पक्षाचा एकही प्रतिनिधी सामील नव्हता. नंतर दिवसांदिवस हा आकडा वाढत गेला. मोर्च्यात लोक आणि संघटन जुळत गेले.  
 
2 ऑगस्टच्या बैठकीत 270 लोक आले, यात सर्व राजनैतिक पक्षाचे स्थानिक नेते आणि सर्व मराठा संघटन सामील होते. पण 9 ऑगस्टला जेव्हा लोक जमले तर सर्वांचे डोळे उघडे राहिले, गर्दीने पाच लाखांचा आकडा पार केला, या मोर्च्याची नीव मराठा संघटनांनी ठेवली होती, ना की कुठल्याही राजकीय पक्षाने. पण या गर्दीला बघून सर्व राजनैतिक पक्षांनी या मोर्चेला स्थानीय स्तरावर मदत करणे सुरू केले.  
 
पुढेे पहा मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचे समीकरण
मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचे समीकरण
 
मराठा नेत्यांचे म्हणणे आहे की मराठांमध्ये देखील एक वर्ग मागासलेला आहे आणि महाराष्ट्रात आत्महत्या करणारे जास्तकरून शेतकरी मराठा आहे. 2014मध्ये राज्याचे तत्कालीन एनसीपी सरकारने मराठांसाठी 16 टक्के आरक्षण घोषित केले होते. पण मुंबई हायकोर्टाने   नोव्हेंबर 2014मध्ये मराठा आरक्षणावर हे म्हणत रोख लावली होती की मराठांना मागास वर्गात मोजू शकत नाही.  
 
यासाठी कोर्टाने 1990च्या मंडळ कमिशन आणि फेब्रुवारी 2000च्या राष्ट्रीय मागास आयोग आणि जुलै 2008च्या महाराष्ट्र राज्य मागास वर्ग आयोग अर्थात बापट कमिशनचा हवाला दिला. कोर्टानं राणे आयोगाच्या रिपोर्टमध्ये बर्‍याच चुका काढल्या. कोर्टाने हे म्हणत सांगितले की सुप्रीम कोर्टाने 50 टक्के आरक्षणाची मर्यादा निश्चित केली आहे आणि राज्य सरकारला मर्यादा ओलांडण्याचा अधिकार नाही आहे.  
 
कोर्टाने याकडे देखील लक्ष ओढून घेतले की सामाजिक आणि ऐतिहासिक दस्तावेजांमधून असे संकेत मिळत आहे की मराठ्यांची सुरुवात शेतकर्‍यांपासून झाली. पण 14व्या शताब्दीनंतर राजनैतिक, शिक्षा आणि सामाजिकरूपेण मोठ्या प्रमाणात ह्या समाजाला वेगळी ओळख मिळाली आहे.  
 
मराठा नेत्यांचा आरोप आहे की नाटक, चित्रपट आणि पुस्तकांमध्ये मराठा समाजाला वर्षांपासून बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, ज्यात नुकतेच मराठी ब्लॉकबस्टर चित्रपट सैराटपण सामील आहे.  
 
पुढे पहा मराठा आंदोलनाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय प्रभाव पडेल?
मराठा आंदोलनाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय प्रभाव पडेल?
प्रश्न असा ही आहे की मराठा आंदोलनाचे महाराष्ट्राच्या राजकारणावर काय प्रभाव पडेल. काय हे आंदोलन फडणवीस सरकारसाठी धोक्याची घंटी आहे, या आंदोलनामुळे मराठा आणि दलितांमध्ये संघर्षतर उभा होणार नाही. हा प्रश्न आता चर्चेचा विषय बनला आहे, कारण सर्व पक्षाचे मराठा नेता या मोर्च्याला मदत करत आहे.  
 
राजकारणात सामील लोकांचे मानणे आहे की या आंदोलनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मात करण्याची संधी त्यांच्या पक्षाचे तील आणि बाहेरील दोन्ही विरोधकांना मिळत आहे.  
 
महाराष्ट्रात देवेंद्र फडनवीस हे ब्राह्मण मुख्यमंत्री असल्यामुळे सर्वात आधी शरद पवार यांच्या या चुटकीवर वाद सुरू झाला होता, जी त्यांनी  कोल्हापुराच्या संभाजी महाराज यांना भाजपने राज्यसभेत घेण्याबद्दल म्हटली होती. महाराष्ट्रात पुढील वर्षात स्थानिक संस्थेचे निवडणूक होणार आहे, ज्याला मिनी विधानसभा निवडणुकीच्या रूपात बघण्यात येत आहे, राजनीतिज्ञ मानत आहे की या आंदोलनांचा वापर या निवडणुकीसाठी पाया तयार करण्यासाठी केला जात आहे.  
 
मराठवाड्यात दलित आणि मराठा संघर्षाचा इतिहास राहिला आहे, मराठवाडा युनिव्हर्सिटीच्या नामांतरच्या वेळेस हा संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राने बघितला होता. आता मराठा आंदोलनाची एक मागणी एट्रॉसीटी रद्द करण्याची आहे, ज्यामुळे आता काही दलित नेते याचा विरोध करत आहे.  
 
काही दलित संघटनांनी या मागणीच्या विरोधात मोर्चा काढण्याची तयारी सुरू केली आहे, तर दलित नेता प्रकाश आंबेडकरने म्हटले की मराठांच्या आंदोलनाच्या विरोधात दलितांनी आंदोलन नाही करावे, कारण मराठ्यांचे आंदोलन दलितांच्या विरोधात नाही आहे.  
 
पण एक गोष्ट स्पष्ट आहे की लाखो मराठ्यांचे रस्त्यावर उतरल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन भूकंप आला आहे आणि यावर आता सर्वांची नजर लागली आहे. हे तर स्पष्ट आहे की जेव्हा एका समाजाचा असंतोष एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येईल तर त्याला  दुर्लक्ष करू शकत नाही.