शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2016
Written By वेबदुनिया|

साप्ताहित भविष्यफल 1 ते 8 मे 2016

मेष : मतभेद टाळावेत

विचाराने व मोजकेच बोलल्यास मनःस्ताप होत नाही. गुरुवारी हर्षलचा मंगळाशी केंद्र व शुक्राशी षडाष्टक योग होत आहे,त्यामुळे कौटुंबिक जीवनात मतभेदाचे प्रसंग कसोशीने टाळावेत. महत्त्वाच्या आर्थिक व्यवहारात वाद संभवतात. विनाकारण खर्च नकोच. पंचमस्थ शुक्रामुळे कला,गुणांचा विकास होईल, संततीसौख्य लाभेल.भागीदारीच्या व्यवसायात वादविवाद राहतील. नव्या संधी लाभणार आहेत. महिलांना अस्वास्थ्य राहील.विद्यार्थ्यांना प्रगतीच्या संधी.

वृषभ : चिंता करू नका

 
WD

संयम आपणास अमर्याद अधिकार देत असतो.१ ऑगस्टला धनस्थ मंगळाचा लाभस्थ हर्षलशी केंद्र व शुक्राशी षडाष्टकयोग होत आहे, त्यामुळे आर्थिक कारणावरून वादविवाद संभवतात.येण्या-देण्याचे व्यवहार विचारपूर्वक करावेत. धनस्थ गुरु, बुधामुळे आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. उतावीळपणाने निर्णय नकोत. कला, गुणांना आता चांगल्या संधी लाभतील. नव्या विचारांना गती येईल. प्रयत्नांना यश मिळणार आहे. कौटुंबिक जीवनात वादाचे प्रसंग टाळावेत. 

मिथुन : मतभेद टाळावेत

 
WD

इतरांना सुख देणे हे महादान आहे. १ ऑगस्टला राशीतील मंगळाचा कर्मस्थ हर्षलशी केंद्र व शुक्र-हर्षलचा षडाष्टक योग होत आहे, त्यामुळे कार्यक्षेत्रात व कौटुंबिक जीवनात सामंजस्याने राहावे, मतभेदाचे प्रसंग टाळावेत. उत्साह, धडाडी वाढेल, आपली आर्थिक स्थितीही सुधारेल.राशीतील गुरुमुळे आपल्याला गुरुकृपा आहे, बिनधास्त राहावे.योजलेली कामे अपेक्षेपेक्षाही अधिक यशस्वी होतील. विद्याथ्र्यांना अनुकूलता. 


कर्क : नवीन गुंतवणूक नको

 
WD

आपले आजचे खोटे बोलणे उद्या पुन्हा खोटे बोलण्यास भाग पाडील.गुरुवारी मंगळ-हर्षल केंद्र व शुक्र-हर्षल षडाष्टकयोग होत आहेत, त्यामुळे आर्थिक कारणावरून वाद संभवतात. राशीतील रविमुळे अंगीकृत कार्यात समाधान लाभेल. अडचणी कमी होतील.धनस्थ शुक्रामुळे अनुकूलता राहील. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. धार्मिक, सामाजिक कार्यात पुढाकार घ्याल. जामीन कोणास राहू नका. नवीन गुंतवणूक सध्या नको. व्यवहार जागरूक राहून करावेत. महिलांना अस्वास्थ्य राहील. विद्यार्थ्यांना धनचिंता राहील. 


सिंह : मानसिक त्रास

 
WD

माणसाचे चारित्र्य आरशात दिसत नसते. लाभस्थ मंगळाचा अष्टमस्थ हर्षलशी केंद्र व राशीतील शुक्राचा हर्षलशी षडाष्टक योग होत असल्याने मानसिक त्रास संभवतो. आर्थिक व्यवहार स्फोटक होण्याची शक्यता आहे. सरकारी कामात अडचणी येतील.लाभस्थ ग्रहांमुळे आर्थिक़ प्रगती मनासारखी होईल.नवे विचार, नव्या योजना विचाराने मार्गी लावाव्यात. शारीरिक तक्रारींची काळजी घ्यावी. विवाहेच्छूंचे विवाह जमतील. नव्या संधी लाभल्याने समाधान लाभेल.  


कन्या : पेल्यातील वादळे

 
WD

जीवन एक नाटक आहे, कथानक नीट जाणल्यास सुख लाभेल. सप्तमातील हर्षल मंगळाशी केंद्र व शुक्राशी षडाष्टक योग करणार आहे, त्यामुळे कार्यक्षेत्रात मतभेदाचे प्रसंग टाळावेत. कौटुंबिक जीवनातही पेल्यातील वादळे येतील. शांततेने घ्यावे.लाभातील रविमुळे सरकारी कामे यशस्वी होतील. स्पर्धा परीक्षांत यश मिळेल. आर्थिक उत्कर्ष थोडा विलंबाने होणार आहे. नवीन जबाबदारी स्वीकारावी लागेल. 


तुळ : अस्वास्थ्य राहील

 
WD

सर्व आनंदीवृत्तीने केल्यास कोणतेच काम अवघड नाही. राशीस्वामी शुक्राचा हर्षलशी षडाष्टक योग होत आहे, तसेच मंगळ-हर्षल केंद्रयोग होत आहे, त्यामुळे कौटुंबिक जीवनात अस्वास्थ्य राहील. भाग्यासाठी संघर्ष करावा लागेल. लाभातील शुक्रामुळे आर्थिक बाबतीत विशेष अनुकूलता राहील. महत्त्वाच्या संधी लाभतील. लाभ उठवावा. प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. जपून असावे. चांगल्या घटना घडतील. योजलेली कामे होतील. विद्यार्थ्यांना नव्या संधी लाभतील. 


वृश्चिक : आर्थिक अनिश्चितता

 
WD

जेथे चातुर्याची गरज असते, तेथे बळजबरी उपयोगाची नसते. आठव्या मंगळाचा पंचमस्थ हर्षलशी व हर्षलचा कर्मस्थ शुक्राशी षडाष्टक योग होत आहे, त्यामुळे मुख्यत: शारीरिक बाबतीत काळजी घ्यावी लागेल. व्ययात शनि, राहुही त्यामुळे आर्थिक बाबतीत अनिश्चितता राहील.विशेष जागरूक राहावे लागेल.सरकारी कामे मनासारखी होतील. नवीन धोरणे विचाराने राबवावित. 


धनु : मतभेद टाळावेत

 
WD
शत्रूपासून मुक्त होण्याचा मार्ग म्हणजे त्यांना मित्र बनणे होय. सुखस्थ हर्षल मंगळाशी केंद्र व शुक्राशी षडाष्टक योग करणार आहे,त्यामुळे कौटुंबिक जीवनात सध्या अस्वास्थ्य राहील. अष्टमातील रविमुळे प्रकृतीच्या तक्रारी राहतील. उपजत कला, गुणांना आता अधिक वाव मिळेल. कार्यक्षेत्रात, सरकारी कामांत अधिक लक्ष द्यावे लागेल. नव्या विचारांना चालना मिळेल.आर्थिक प्रगती चिकाटीने होईल. दूरचा प्रवास वज्र्य करावा. विद्यार्थ्यांना प्रगतीच्या संधी लाभतील.  

मकर : मतभेद टाळावेत

 
WD

प्रेम व सौजन्य उपेक्षू नका, उलट ते द्या. मंगळ-हर्षल केंद्र व शुक्र-हर्षल षडाष्टक योगामुळे भावंडाशी व कौटुंबिक जीवनात मतभेदाचे प्रसंग संभवतात.अडचणीतून मार्ग निघेल. भागीदारीच्या व्यवसायात अनुकूलता वाढेल. महत्त्वाच्या घटना घडतील. स्पर्धा परीक्षांत यश मिळेल.अडचणीवर वेळीच मात कराल. दैनंदिन कामांकडे अधिक लक्ष द्यावे.अचानक प्राप्ती होईल. सरकारी कामे मनासारखी होतील.  


कुंभ : आर्थिक कारणावरून वा

 
WD

मार्गात अडथळा आला तर प्रयत्नाने दूर करा, रडणे बंद करा.धनस्थ हर्षलचा पंचमातील मंगळाशी केंद्रयोग व सप्तमातील शुक्राशी षडाष्टक योग होत आहे, त्यामुळे आर्थिक कारणावरून वादाचे प्रसंग संभवतात. कार्यक्षेत्रात असलेल्या अडचणी आता दूर होतील. नवी कामे मार्गी लागतील. अडचणीतून सुटका होईल. आर्थिक गुंतवणूक विचाराने करावी. अनावश्यक खर्च टाळावा. महत्त्वाच्या घटना घडतील.  


मीन : मोठे धाडस नको

 
WD

कधीही आशा सोडू नका. राशीतील हर्षल सुखस्थ मंगळाशी केंद्र व शुक्राशी षडाष्टक योग होत आहे, त्यामुळे कोणतेही मतभेद टाळायलाच हवेत. फार मोठे धाडस सध्या दाखवू नका. स्थावर प्रश्न उद्भवतील.चौथा मंगळ दगदग वाढविणार आहे. आठवे शनि,राहु प्रकृतीच्या तक्रारी ठेवतील. कोणतेही निर्णय घाईने घेऊ नयेत.