जानेवारी 2019 महिन्याचे भविष्यफल

Last Modified मंगळवार, 18 डिसेंबर 2018 (13:54 IST)
मेष - मानसिक सुख शांतीसोबत बाहेरच्या संपर्कांमुळे लाभ मिळेल. शत्रुपक्ष प्रभावहीन होतील. कौटुंबिक बाबतीत सावधगिरी बाळगावी लागेल. संतानं पक्षाकडून प्रसन्नता मिळेल. दैनिक व्यवसायात फायदा मिळून जोडीदाराचा साथ मिळेल. आयच्या साधनात वृद्धी होईल. नवीन वर्षाच्या नवीन महिन्यात योग्य वेळी म्हणजे जानेवारीपासून तुमची मुसंडी यशस्वी होईल. अधिकार प्राप्ती होईल. नेतृत्व व पुढारीपण लाभेल. लोकांना उपकृत कराल. या महिन्यात आरोग्य चांगले राहील. नव्याने काम करण्यासाठी उत्तम काळ. काही प्रश्नांची सोडवणूक सर्वांना एकत्र आणून करावी लागेल. शत्रूंपासून दूर राहा. आरोग्य नरम-गरम राहील. देवाण-घेवाण टाळा.
वृषभ - आरोग्याच्या दृष्टीने वेळ अनुकूल राहील. व्यापार व्यवसायात संमिश्र स्थिती राहील. पराक्रमात वाढ होऊन भावंडांचा साथ मिळेल. नोकरी करणार्‍या व्यक्तींसाठी वेळ अनुकूल आहे. दांपत्य जीवन उत्तम राहील. नवीन परिचय होतील. त्यातून मैत्रीचे रूपांतर नाजूक प्रेमात होईल आणि वैवाहिक गोष्टींना पोषक ठरणारे वातावरण निर्माण होईल. कामानिमित्त नवीन हितसंबंध जोडले जातील. महिलांनी होकेखोर वृत्ती सोडून सामंजस्याने वागावे. नवीन योजनांना गती येईल.
मिथुन - उत्साहात वाढ होईल. तुम्ही तुमच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यास समर्थ व्हाल. पारिवारिक प्रकरणात सावधगिरी बाळगावी लागणार आहे. जोडीदाराला सहयोग द्यावा लागणार आहे. व्यापार-व्यवसायात अनुकूल स्थिती राहील. विद्यार्थी वर्गासाठी वेळ उत्तम आहे. बहारी प्रकरणात
सतर्क राहणे गरजेचे आहे. या महिन्यात घरात मंगलकार्ये ठरतील. उद्योग-धंद्यात यश लाभेल. तुमचा उत्साह व जोम सळसळता राहील. त्यामुळे कामाचा झपाटा वाखाणण्यासारखा असेल. व्यवसायात नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. या महिन्यात अपेक्षेनुसार कार्ये होतील. आरोग्य उत्तम राहील. मित्रांपासून, सहकाऱ्यांपासून लाभ मिळेल. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील.
कर्क - भाग्यात अनुकूल स्थिती असल्याने प्रसन्नता मिळेल. मन प्रसन्नतेचा अनुभव करेल. ज्यांना परदेशात जायचे आहे त्यांच्यासाठी वेळ उत्तम आहे. संतानपक्षाकडून चांगली बातमी मिळेल. हा महिना गोचर ग्रहानुसार मध्यमफळ देणारा दिसत आहे. ललित कलेत रूची वाढेल, पाहुण्यांच्या आगमनाने आनंद होईल. ठरवलेले काम मोठ्या मुश्किलीने होईल, अधिकारींसोबतची जवळीक टाळा. उदरनिर्वाहासाठी आपापल्या क्षेत्रात कार्यरत व्यक्तींना आपल्या सहकारी लोकांसोबत जुळवून घेणे आवश्यक ठरेल. आपण आपल्या पराक्रमाने परिस्थितीला सकारात्मक बनवण्यात सफल व्हाल.
सिंह - तुम्ही तुमच्या सर्व महत्वाकांक्षाएं या महिन्यात पूर्ण करू शकाल. जोडीदाराशी विवादापासून दूर राहा. पार-व्यवसायात समजदारीने काम करा. जोखिमीच्या कार्यात सावधगिरी बाळगा. शत्रुपक्षावर संमिश्र स्थिती राहणार आहे. पराक्रमाच्या माध्यमाने तुम्ही अनुकूल मिळवाल. या महिन्यात पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाजू बळकट राहील. नव्या खरेदीसाठी ही वेळ अनुकूल आहे. नवे लाभदायक संबंध प्रस्थापित होतील. धार्मिक कार्यात रुची वाढेल. वैवाहिक जीवन कडू-गोड राहील. विध्यार्थी वर्गाला अधिक मेहनत करण्याची आवश्यकता आहे. चांगला काळ येणार आहे. शुभ संदेश आयुष्यात आनंदाची पखरण करतील. या शुभ काळाचा पूर्ण फायदा घ्या. मिळकतीची नवी साधने उपलब्ध होतील.
कन्या - वेळेचा सदुपयोग करा. जीवनातील चढ उतारामुळे दुखी होऊ नका. जोडीदाराचा साथ घेऊन चालल्याने तुम्हाला थोडा आराम मिळेल. पारिवारिक प्रकरणात सहयोग मिळेल. आरोग्य चांगले राहील.
शत्रूंपासून राहत मिळेल. व्यापार-व्यवसाय व नोकरीत अनुकूलता लाभेल. जर तुम्ही परिश्रम केलेत तर प्रगतीचे नवे दरवाजे खुलतील. बदलत्या वातावरणामुळे स्वास्थ्य बिघडू शकते. आई-वडिलांशी बाचाबाची होण्याची शक्यता आहे. फिरायला जाण्याआधी घराच्या सुरक्षेची नीट तजवीज करून जा. मनोरंजनावर अधिक खर्च केल्यामुळे महिनाअखेरीस तुम्हाला आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागेल. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. कुठेतरी बाहेर फिरायलाही जाऊ शकाल.
तूळ
- पारिवारिक प्रकरणात सावधगिरी बाळगा. आईच्या आरोग्याचे लक्ष्य ठेवणे गरजेचे आहे. जनतेशी संबंधित प्रकरणात सावधगिरी बाळगा. आर्थिक प्रकरणात विचार करून चालावे लागणार आहे. वायफळ खर्च करणे टाळावे लागणार आहे. भागीदारीच्या प्रकरणात यशस्वी व्हाल. शत्रुपक्ष प्रभावहीन होतील. अपेक्षित परिणाम मिळाल्यामुळे मन प्रसन्न राहील. मिळकतीतील वृद्धीने आर्थिक बाजू सुदृढ होईल. आरोग्याच्या बाबतीत जागरूक राहा. मित्रांचे वागणे साहाय्यकारी ठरेल. पत्नीचे स्वास्थ्य चिंताजनक राहू शकेल. दीर्घ प्रवास थकवणारे ठरतील. हवेत गप्पा मारणे ठीक नाही. अडलेली कामे पूर्ण होण्याची वेळ जवळ आली आहे.
वृश्चिक - कार्यात अडचणी येतील पण स्वप्रत्यांनी त्यात यश मिळेल. जर तुम्ही राजनीतिज्ञ असाल तर सावधगिरी बाळगा. नोकरी करणार्‍या लोकांना सांभाळून चालवे लागणार आहे. एकाद्या महत्त्वपूर्ण कार्यात भाऊ व मित्रांचा सल्ला अनुकूल ठरेल. महिन्याची सुरुवात कष्टप्रद होईल, पण १५ तारखेनंतर आर्थिक बाजूत सुधार होण्याची चिन्हे आहेत. पण शारीरिकदृष्ट्या उदर आणि गुडघ्याच्या दुखण्याचा त्रास होऊ शकतो. आप्तजनांची साथ तुम्हाला जीवनात पुढे जाण्याची प्रेरणा देत राहील. अपत्य-प्राप्तीचे सुख मिळण्याचे संकेत आहेत. जुन्या मित्रांच्या भेटी तुम्हाला साहाय्यकारी ठरतील. शत्रू शांत असतील. वाहन आणि मालमत्तेची खरेदी वगैरे तुमच्यासाठी फारच फायदेशीर ठरेल.
धनू - तुम्ही तुमचे काम तुमच्या विवेकाने करण्यात यशस्वी ठराल. विद्यार्थी वर्गासाठी वेळ सुखद ठरेल. प्रेमात स्थिती अनुकूल असेल. शत्रुपक्षाकडून आराम मिळेल. दांपत्य जीवन सुखद राहील. प्रसिद्धी मिळेल. प्रवास होण्याची शक्यता आहे. मेहनतीचे फळ दिसू लागले आहे, पण अती महत्त्वाकांक्षी बनू नका. रणनीती अवलंबूनच पुढे व्हा. स्वास्थ्य ठीकठाक राहील. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. लक्षात असू द्या, प्रेम देण्याचे नाव आहे म्हणून प्रेमसंबंधात देणे शिका. कोणीतरी जुना साथीदार किंवा नातेवाईक सुदैवाने भेटू शकतील. बदलत्या वातावरणाने आजारी पडण्याची लक्षणे आहेत, सावध राहा.
मकर - भाग्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. एखाद्या कार्यात होता होता अडचणी येतील.
नोकरदारांनी सांभाळून काम करावे. व्यापार-व्यवसायात संमिश्र स्थिती राहणार आहे. दैनिक व्यवसाय ठीक चालेल. शत्रू वर्ग प्रभावहीन होईल. राजकारणाशी निगडित लोकांनी सावधगिरी बाळगायला पाहिजे. समाजात आपले यश वाढेल आणि करिअरमध्ये प्रगती होईल. भाग्य तुमचे साथ देईल. पण आर्थिक दृष्ट्या चढ-उताराचा सामना करावा लागू शकतो. यासोबतच प्रापंचिक आणि कौटुंबिक पातळीवरही समस्यांशी चार हात करावे लागू शकतील. कुटुंबातील सदस्यांसोबत कुठल्याही वादात पडणे टाळा. आपल्या रचनात्मकतेचे कौतुक होईल. भौतिक साधनांवर पैसे खर्च होतील. मित्रांचे सहकार्य आपल्या जीवनाच्या गाडीला गतिमान करेल.
कुंभ - शत्रू परास्त होतील. कर्जापासून मुक्ती मिळेल. दांपत्य जीवनात संमिश्र स्थिती राहणार आहे.
दैनिक व्यवसायात सतर्कता ठेवावे लागणार आहे. भाग्याच्या बाबतीत काही अडचणी येतील. कामात मन लागणार नाही. एखाद्या महत्त्वाच्या कामात सांभाळून चालावे लागणार आहे. साहस बनून राहील. या महिन्यात तुमच्यासाठी सर्वकाही सामान्य राहील. नव्या लोकांच्या ओळखी होतील, ज्या पुढे लाभदायक ठरतील. नोकरीसाठी एखाद्या नव्या शहरात जाऊ शकता. अडकलेले धन परत मिळेल. जोडीदार तुमच्यासाठी पर्वतासमान सिद्ध होईल. मानसिक शांती लाभेल. तणाव पुरेशा प्रमाणात कमी होऊ शकेल. चित्त शांत राहील. अपत्याकडून शुभ बातमी कळेल. एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करा, त्यामुळे तुम्हाला चांगले वाटेल. परिवारात आपला सन्मान वाढेल. तुमच्या बोलण्याला वजन येईल.
मीन - भाग्याच्या दृष्टीने बघितले तर वेळ चांगला आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अडचणी आता दूर होतील. व्यापार-व्यवसायात वातावरण सुखद राहील. नोकरी करणार्‍या लोकांना आराम मिळेल. साहस बळात वृद्धी होईल. सर्व इच्छा पूर्ण होतील. आरोग्य उत्तम राहील.
विदेश प्रवासाचा योग आहे. मिळकतीचे नवे मार्ग खुलतील. तुमचे शांत चित्त तुम्हाला अनेक त्रासांपासून वाचवेल. जोडीदाराची साथ मिळेल. अपत्यांकडून चांगली बातमी समजेल. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात लागेल. प्रॉपर्टीत गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे. यशाचा मार्ग मोकळा होत आहे. नव्या संबंधांचा फायदा होईल. ऑफिसमध्ये सह-कर्मचारींचे वागणे सहाय्यभूत ठरेल. कुठे तरी बाहेर जाण्याचा कार्यक्रम ठरू शकतो. जोडीदारासोबत खास क्षण घालवू शकाल.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

महाशिवरात्रीला आज ‘शश योग’

महाशिवरात्रीला आज ‘शश योग’
महाशिवरात्रीच्या निमित्ताने आज एक विशेष योग जुळून आला आहे. तब्बल ५९ वर्षांनतर आज ...

श्रीशिवशंकर द्वादश नामावली

श्रीशिवशंकर द्वादश नामावली
महादेवाचे अनेक मंत्र, श्लोक, स्रोत, चालीसा आणि अष्टक उपलब्ध आहेत परंतू हे महाशिवरात्रीला ...

12 ज्योतिर्लिंग ज्यात आहे महादेवाचा वास

12 ज्योतिर्लिंग ज्यात आहे महादेवाचा वास
Kashi Vishwanath काशी विश्वनाथ मंदिराला वाराणसीचं स्वर्ग मंदिर असे देखील म्हटलं जातं. ...

शिवचरित्रातून काय घ्यावे?

शिवचरित्रातून काय घ्यावे?
छत्रपती शिवाजीराजांच्या जन्माला जवळ जवळ चारशे वर्षे होत आली तरी त्यांची कीर्ती, त्यांची ...

महाशिवरात्री: महादेवाला प्रसन्न करण्यासाठी काय करावे- काय ...

महाशिवरात्री: महादेवाला प्रसन्न करण्यासाठी काय करावे- काय टाळावे
महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी काय ...

फक्त राहुल गांधी हेच काँग्रेसला वाचवू शकतात

फक्त राहुल गांधी हेच काँग्रेसला वाचवू शकतात
20- काँग्रेसला उभारी देण्यासाठी पक्षाचा अध्यक्ष लोकशाही पद्धतीने निवडला पाहिजे असे माजी ...

'हाच' खरा सर्वधर्म समभाव, मठाने मु्स्लिम युवकाला मुख्य ...

'हाच' खरा सर्वधर्म समभाव, मठाने मु्स्लिम युवकाला मुख्य पूजारी नेमले
उत्तर कर्नाटकातील हुबळी जिल्ह्यातील गदग येथे लिंगायत धर्माने धर्म परंपरेला छेद देत ...

बाप्परे, चक्क साबणाची किंमत लाख रुपयांमध्ये

बाप्परे, चक्क साबणाची किंमत लाख रुपयांमध्ये
सामान्यपणे बाजारात १० रुपयांपासून १ हजारपर्यंतच्या किंमतीचे साबण बाजारात मिळतात. परंतु एक ...

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रकृती ठणठणीत

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रकृती ठणठणीत
छत्रपती घराण्यातील सातारा-जावलीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रकृती अचानक ...

भीमा-कोरेगाव प्रकरणी पवार यांना समन्स बजावा

भीमा-कोरेगाव प्रकरणी पवार यांना समन्स बजावा
भीमाकोरेगाव हिंसाचार प्रकरणी साक्ष नोंदविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ...