मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2019
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 डिसेंबर 2018 (15:06 IST)

वृश्चिक राशी भविष्यफल 2019

2019 सालच्या राशी भविष्यानुसार गुरुसारखा सात्विक आणि भव्य दिव्य दृष्टिकोन देणारा ग्रह वर्षभर तुमच्या राशीत राहणार आहे. त्यावेळी शनि आणि शुक्र या दोन ग्रहांचीही तुम्हाला साथ लाभणार आहे. शनीची साडेसाती असली तरी पराक्रमातला केतू मार्चपर्यंत मदतीचा ठरेल. स्वराशीत गुरू हिताकडे ठरेल. साडेसातीच्या काळात आपल्या मानसिक समंयमाची परीक्षा ठरेल. शनि – धनु राशि, गुरु – वृश्चिक राशि आणि राहु 6 मार्च, 2019 मध्ये मिथुन राशित असेल. तर केतु धनु राशि, गुरु राशि परिवर्तन करून 30 मार्चला धनु राशि आणि 25 एप्रिलला वृश्चिक राशित गोचर करून 5 नोव्हेंबरला परत धनु राशित गोचर करेल. हे 10 एप्रिलला वक्री होवून शनि 30 एप्रिलला वक्री होवून 18 सप्टेम्बरला मार्गी होतील.
 
कौटुंबिक जीवन
सप्टेंबर पर्यंत कालवधी उत्तम असल्याने विवाह, वास्तुशांती, प्रिय व्यक्तींच्या जीवनातील सुखद प्रसंग या सर्व गोष्टींचा अनुभव येईल. थोरमोठ्यांचा सहवास लाभेल पण हे यश डोक्यात जाऊ देऊ नका. आंनदातही संयमाने वागण्याचा प्रयत्न करा. हाच विनय आपल्या यशाचे आयुष्य वाढवत असतो. तुमच्या लग्‍न भावात बसलेला गुरु पारिवारिक जीवनाला सुखमय बनवतो. या वर्षी तम्ही आपल्या जीवनातील किती तरी क्षण यादगार बनवताल. मित्र तथा नातेवाईकां बरोबर कुठे फिरण्या साठी जाताल. खूप खूब मौज-मस्‍ती करताल. लहान भावंडात सन्मान वाढेल. तुमचे वैवाहिक जीवन सामान्‍य राहणार आहे. 
 
आरोग्य
भविष्यानुसार तुमची आरोग्य परिस्थिती पाहता या वर्षभरात तुम्हाला अधिक काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला फिटनेसच्या समस्येला सामोरे जावे लागेल. आरोग्याची परिस्थिती खालावली तर दुर्लक्ष करू नका. ताबडतोब आजारावर उपचार सुरू करा. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात तुमची प्रकृती नाजूक राहील. ज्येष्ठांना आणि महिलांनी प्रकृतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तुम्हाला आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. 
तळलेल्या पदार्थांच सेवन जास्त करू नये. जंक फूड खाऊ नये बाकी जास्त चिंता करण्याची गरज नाही.   
 
करियर
तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये यश लाभेल आणि त्यात अनेक सुवर्ण संधी लाभतील. चांगल्या कंपनीकडून तुम्हाला जॉब ऑफर मिळेल. कामाच्या निमित्ताने परदेशी जाण्याची शक्यता आहे. या वर्षी तुम्हाला आर्थिक बाबतीत संमिश्र परिणाम पाहायला मिळतील. तुम्ही आर्थिक चढ-उतार अनुभवाल. जर तुमचा दशा स्‍वामी राहु या केतु असेल तर या या ग्रहांच्या नक्षत्राततुमच्या आपल्या करियर वर खूप वाईट प्रभाव पडणार आहे. नाही तर तुमच्या साठी चांगली वेळ आहे. प्रमोशन, कुठले नवीन काम मिळणे, नवीन नोकरी तसेच पगारात वाढ होण्याची संभावना आहे. वेळेचे महत्व जाणा. आपल्यातील धाडस, बद्धिमत्ता यातून आपल्या कामाचे स्वरूप बदलेल. मात्र आपल्या हाताखालील लोकांना सन्मानाने वागवा. बिजनेस साठी चांगली वेळ आहे. तुम्हाला कुठले नवीन काम मिळू शकेल. नवीन मित्र किंवा नवीन बिजनेस करण्याचे विचार तुमच्या मनात घोळत असतील. लोकांचा साथ मिळेल. राहु किंवा केतुची  दशा असेल त्या लोकांना वाईट स्वप्न परेशान करतील अन्‍यथा हे वर्ष तुमच्या साठी  शुभ असेल.
 
व्यवसाय
या वर्षी तुमची आर्थिक स्थि‍ति खूपच उत्तम राहणार आहे. बिजनेस मध्ये खूप पैशे कमवण्याची संधी मिळेल. तुम्ही पैसा-पाणी जपून ठेवता. बैंक बैलेंस वाढेल पण हे लक्षात ठेवा कि तुम्हाला कुठल्या बॉन्‍ड किंवा अन्‍य जागी पैशाची गुंतवणूक करण्याची गरज नाही. उद्योग धंद्यात मोठी उडी घेण्याच्या दृष्टीने चांगले बेत तुम्ही या पूर्वीच आखून ठेवले असतील. त्याचा श्रीगणेशा नवीन वर्षात होण्याची शक्यता आहे. पैशाची आवकही चांगली राहील. नवीन करारमदार झाल्याने व्यापारीवर्गास आणि कारखानदारांना उलाढाल आणि फायदा वाढवरे शक्य होईल. देशात अथवा परदेशात नवीन कामास सुरवात होईल. ओकरीमध्ये असणार्‍यांना बढती अथवा जादा पगारवाढीचे आश्वासन पूर्वी मिळाले असेल, पण ते काही कारणानेपूर्ण झाले नसेल तर त्याचा आनंद येत्या वर्षात मिळेल. 
 
रोमांस
तुमचे उत्पन्न आणि खर्च यात तफावत आढळून येईल. त्यामुळे या दोघांचे नीट ताळमेळ ठेवा. दुसरीकडे तुमच्या शृंगारिक आयुष्यासाठी हे वर्ष अनुकूल आहे. प्रेम जुळून येण्याची संधी आहे आणि नात्याची वीण अधिक घट्ट होईल. प्रेम संबंधा बाबत त्रास उत्पन्न होतील. कुठले प्रेम संबंध लग्नाच्या बंधनात जखडले जातील. नवीन नात जुळू शकेल. या वर्षी भरपूर प्रेम मिळेल. मार्च महिन्या नंतर तुम्हाला तुमचे खरे प्रेम मिळेल.
 
उपाय
या वर्षी तुम्हाला काही जास्त उपाय करण्याची गरज नाही. गुरु तुमची सगळी काम होवू देईल. तुम्ही फक्त महिन्यातून एकदा गुरुवारी पंडित किंवा ब्राह्मणाला पिवळ्या रंगाचे वस्‍त्र दान करावेत किंवा देवळाच्या बाहेर पाण्याची टाकी लावावी.