Widgets Magazine
Widgets Magazine

नटण्याचे आकर्षण स्त्रियांपेक्षा पुरुषांना अधिक

वेबदुनिया 

beauty
वयात आले की मुलींना नटण्यामुरडण्याविषयी वाटायला लागते. मुली, स्त्रियांना नटायला, सुंदर दिसायला खूप आवडते, असे सर्वसाधारण मानले जाते. किंबहुना स्त्रियाच या क्षेत्रात अग्रेसर असल्याचे दाखले दिले जातात.

नऊला बाहेर जायचे असेल तर बायकोला सातची वेळ द्यावी लागते, तर तिचे नऊपर्यंत आवरते, अशा शब्दात त्यांची टिंगलही केली जाते, पण पुरुष वाचकांनो, ही आवड फक्त महिला, मुलींनाच नसते, तर पुरुषांनाच अधिक असते, असे संशोधन सांगते.

दिवसभरात पुरुष मंडळ आंघोळ, दाढी, केस विंचरणे, कपडे परिधान करणे यासाठी तब्बल 81 मिनिटे खर्च करतात. तर महिला हे सगळी फक्त 75 मिनिटांत आवरतात.

सुंदर दिसण्यासाठी मेकअप करणे आलेच. महिलांना यासाठी 9 मिनिटे पुरतात. तर पुरुषांना मात्र एक मिनीट जास्तीत लागतो. कपडे निवडण्यातही महिलाच वेगवान आहेत. 10 मिनिटांत महिला कपडे निवडू शकतात. तर यासाठी पुरुषांना 13 मिनिटे लागतात, असे या ब्रिटनमधील पाहणीतून स्पष्ट झाले आहे. तेव्हा यापुढे सावधान... महिलांना त्यांच्या नटण्यावरून काही बोलू नका. नाहीतर ही आकडेवारी तुमच्या तोंडावर फेकली जाईल. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

सखी

news

#HappyMothersDay

" आई " आई साठी काय लिहू आई साठी कसे लिहू आई साठी पुरतील एवढे शब्द नाहीत कोठे ...

news

या आईला तर काही, काही कळत नाही

या आईला तर काही, काही कळत नाही ओरडत असते सदानकदा.. जरा ब्रेक नाही.. झोपेतून उठवून ...

news

निबंध – माझी आई

“हो आई! झाला गृहपाठ. ‘माझी आई’ या विषयावर बाईंनी नीबंध लिहून आणायला सांगीतला होता. माझी ...

news

ऑइली स्कीनसाठी काकडीचे फेस मास्क

ऑइली स्कीनवर डाग आणि पिंपल्सची समस्या उद्भवू शकते. उन्हाळ्यात तर ऑइली स्कीनची अधिक ...

Widgets Magazine