गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By वेबदुनिया|

सौंदर्याचे पहिले पाऊल : स्नान

आपण चांगले दिसण्यासाठी कित्येक खटाटोप करतो. पण सौंदर्य वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न तेंव्हाच यशस्वी ठरतील जेंव्हा आपण स्वच्छ आणि प्रसन्न असू. म्हणूनच सौंदर्याचे पहिले पाऊल म्हणजे स्नान.

आंघोळ या शब्दाचा अर्थ फक्त साबण लावून पाणी ओतणे हा नसून यात संपूर्ण शरीराची स्वच्छता होणे अपेक्षित आहे. सौंदर्यशास्त्राच्या दृष्टिने अतिशय गरम किंवा अगदीच थंड पाण्याने आंघोळ करणे चुकीचे आहे.

थंड पाण्याने त्वचा कोरडी होते, तर गरम पाण्यातने त्वचेवर सुरकुत्या पडतात. कोमट पाणी वापरणे सर्वोत्तम आंघोळीच्या पाण्यात कृत्रिम सुगंध न मिसळता नैसर्गिक सुगंधी तेलांचा वापर करावा.

त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी रंध्रे मोकळी करावी लागतात, त्वचेवर धूळ आणि मृत पेशी चिकटून छिद्रे बंद होतात. त्यामळे रोगही पसरतात. त्वचा काळसर दिसायला लागते.

यावर आंघोळ हा सर्वोत्तम उपाय आहे. टीव्हीवर भलेही विविध साबणांची भलामण करणार्‍या जाहिराती आल्या तरी आपण साबणाचा शक्य तितका कमी उपयोग करावा. कारण साबणात स्वच्छतेपेक्षा सुंगधाकडेच लक्ष दिले जाते.

खरे तर वापरण्यासाठी बेबी सोप चांगला. हे हास्यास्पद वाटेल पण खरे आहे. कारण तीव्र स्वरूपाचे आणि तीव्र सुंगध घातलेले साबण वापरल्याने आम्ल आवरणाची क्षती होऊन सूक्ष्म जीवजंतूपासून त्वचेचे पुरसे संरक्षण होत नाही.

म्हणून आवड्यातून एकदाच साबण वापरावा आणि इतर दिवस नैसर्गिक साधनांचा वापर करून आंघोळ करावी.
पूर्वीच्या काळी लोकांची त्वचा आपल्यापेक्षा मऊसर होती.

कारण त्यावेळी साबणांचे प्रकार नव्हते. त्यावेळी फक्त नैसर्गिक साधनांचा वापर केला जायचा. म्हणून आता सौंदर्य वाढवण्यासाठी प्रथम आंघोळीकडे लक्ष द्या. नैसर्गिक साधनांचा वापर त्वचेचे संरक्षण करेल.