Widgets Magazine
Widgets Magazine

झुमका गिरा रे!

वेबदुनिया 

ear rings
कर्णभूषणांमध्ये मोत्यांची कुडी, झुपके, वेल कुडकं, बुगडी यांची चलती आहे. हल्लीच्या काळात या प्रकारची आभूषणे फारच प्रचलित आहेत. कुंडल व कर्णिका अशा दोन प्रकारांत कर्णभूषणे वापरली जायची. कर्णिका कानाच्या वरच्या भागात, तर कुंडल खालच्या भागात घातली जायची. सापाच्या वेटोळ्याप्रमाणे कुंडले वलयाकृती असत. प्राचीन काळी कानात अशी कुंडले वापरली जायची. कुंडलाला नाना प्रकारची रत्नेही जडवली जायची. हेच आधुनिक काळात रिंग बनून आले. मकर कुंडल हा लोकप्रिय प्रकार अत्यंत कौशल्याने बनविलेला असतो. स्त्रियांच्या कानात माशाच्या आकाराची कुंडले आजही दिसतात. भिकबाळी या कर्णकुंडलात दोन मोती असून मधला खडा पाचू, माणिक इत्यादी रत्नांचा असे.

महाराष्टतल्या स्त्रिया जुन्या काळी बाळ्या-बुगड्या, बेल-भोकरे, सोन्या-मोत्याच्या कुड्या घालत असत. आजही कुड्या हा प्रकार महिलांना आवडतो. स्टायलिश डायमंड डँगलर्स म्हणजे लेटेस्ट स्टाइल स्टेटमंट आहेत. आउटफिट पारंपरिक असो, वेस्टर्न, इंडोवेस्टर्न असो; कोणत्याही ड्रेसवर ते शोभून दिसतात. कटस्टोन कलाकुसर, जरीकाम, खडे व सजलेल्या मीनाकारीने अप्रतिम डिझाइनच्या स्लीक, स्मार्ट इयर रिंग्ज असोत वा झोके घेणारे वाळे किंवा गोल गरगरीत झुमके असोत; समारंभ वा उत्सवाच्या खास पर्वात छान उठून दिसतात व हरेक पोशाखाला शोभूनही दिसतात.

अद्भुत डिझाइन, अत्याधुनिक फॅशन-ट्रेण्डी स्ट्राइलमध्ये उपलब्ध असलेले हे वैशिष्ट्यपूर्ण क्लासिक झुमके कुणाही आधुनिक स्वप्नसुंदरीचा वीक पॉइंट ठरले नाही, तरच नवल!Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

सखी

news

महिलांनी का नाही करू दारूचे सेवन?

अल्कोहल शरीरातील पोषक तत्त्व शोषून घेतं. ज्या महिला अधिक मात्रेत अल्कोहलचे सेवन करतात ...

news

हे जाणून घेतल्यावर लगेच लावाल केसांना दही

आरोग्यासाठी दही खाणे उत्तम आहे हे तर सर्वांच माहीत आहे पण दह्याने त्वचा आणि केसांचेही ...

news

योनीवरील केस काढण्यासाठी लेजर पद्धत

लेजर हेअर रिमूव्हलने आपल्या अनावश्यक केसांपासून नेहमीसाठी मुक्ती मिळू शकते. यासाठी ...

news

डार्क सर्कल दूर करण्यासाठी मधाचे 5 उपाय

डार्क सर्कल्स होण्यामागे अनेक कारणं आहेत, जसे योग्य डाइट न घेणे, शरीरात पोषक तत्त्वांची ...

Widgets Magazine