गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 7 ऑक्टोबर 2020 (15:28 IST)

महागडे शॅम्पू नव्हे तर या गोष्टी खाल्ल्यानं आपल्या केसांची गळती थांबेल

केस गळणे ही आजकाल एक सामान्य समस्या बनली आहे. ही समस्या तेव्हा अधिक त्रासदायक ठरते जेव्हा नवीन केस येतंच नाही. कारण केस गळण्याचा प्रमाणातच नवीन केस येतात. ज्यामुळे डोक्यावर केसांची संख्या कमी दिसत नाही. परंतु जर डोक्यावरील केस कमी होत आहे आणि नवे केस येत नाही तर सर्व उपाय करण्यासह आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष देणं देखील महत्त्वाचं आहे. कारण शरीरात योग्य पोषण नसल्यामुळे केसांची गळती सातत्यानं सुरूच असते. 
 
व्हिटॅमिन ई आणि झिंक हे सर्व केसांच्या आरोग्यास गरजेचं आहे. चला तर मग जाणून घ्या की केसांना घनदाट आणि बळकट करण्यासाठी कोणत्या प्रकाराचा आहार घ्यावा.
 
प्रथिने - आपल्या आहारात प्रथिने अधिक प्रमाणात ठेवावं. केसांच्या निर्मितीमध्ये प्रथिने जास्त प्रमाणात लागतात. म्हणून योग्य खाणं-पिणं करून प्रथिने असणाऱ्या वस्तूंचा आपल्या आहारात जास्त प्रमाणात समावेश करावा. 
 
ओमेगा 3 फॅटी ऍसिड असलेल्या वस्तूंना आपल्या आहारात समाविष्ट करावे. हे खाऊन आपल्या केसांची चकाकी आणि आद्रता दोन्ही वाढते. ओमेगा 3 फॅटी ऍसिड असणाऱ्या वस्तू जसे की सोयाबीन, कॅनोला तेल, फ्लेक्स सीड्स आणि चिया सीड्स सारख्या वस्तूंचे सेवन करणं फायदेशीर ठरणार.
 
केसांची गळती रोखण्यासाठी व्हिटॅमिन ए चे सेवन करणं फायदेशीर ठरू शकतं. कारण हे केसांना पातळ होण्यापासून रोखतं. व्हिटॅमिन ए चे स्रोत म्हणून आपण गाजर, टमाटे, अंडी आणि त्यासह दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थांचा सेवन देखील करू शकता.
 
बदाम - केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी आपल्या आहारामध्ये झिंक देखील समाविष्ट करावे. हे फायदेशीर असतं. तीळ, अंडी, हरभरे, बदाम, वाटाणे, चवळी आणि दही हे सर्व झिंक चे चांगले स्तोत्र आहे. आपल्या आहारात या सर्व गोष्टींचा समावेश केल्यानं केस गळण्याची समस्या कमी केली जाऊ शकते.