1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

केसांना मेंदी लावण्यापूर्वी हे नक्की वाचा

hair color tips
केसांना कंडीशनिंगसाठी वा पांढरे केस लपवण्यासाठी का नसो, अनेक लोक केसांना कलर करण्याऐवजी मेंदी लावणं अधिक योग्य समजतात. मेंदी लावणे अत्यंत घरगुती, सोपा आणि स्वस्त उपाय आहे. परंतू मेंदीचं मिश्रण तयार करताना काही गोष्टी लक्षात ठेवण्यासारखा आहे, जाणून घ्या आवश्यक टिपा:
 
1. आपल्याला मेजेंटा रंगाने केस रंगवायचे असतील तर मेंदीमध्ये जास्वंदीचे फुलं वाटून घालावं.
 
2. हिवाळ्यात मेंदी लावताना मेंदीच्या मिश्रणात लवंगा घालाव्या.
 
3. सर्दीचा त्रास असल्यास मेंदीत तेल, चहा किंवा कॉफी मिसळा. आवळा चूर्ण, बीट ज्यूस, दालचिनी, अक्रोड, कॉफी असे पदार्थही मिसळू शकता.
 
4. केसांना मेंदी लावण्यापूर्वी त्यात एका कापुराची लहान वडी आणि मेथी पावडर मिसळावे. याने वयापूर्वी केस पांढरे होण्यापासून बचाव होईल.
 
5. दोन चमचे संतर्‍याच्या रसात दोन चमचे मेंदी पावडर मिसळा आणि शेपूंनंतर केसांना लावून दहा मिनिटाने धुऊन टाका.
 
6. केसांना रंगवायचे असेल तर मेंदीमध्ये दोन चमचे चहाचं पाणी मिसळा.
 
7. मेंदी लावल्यानंतर केस ब्राऊन नसून काळे हवे असल्यास हर्बल काळी मेंदी लावावी. किंवा डाय लावल्यानंतर मेंदीचं पाणी केसांना कंडिशनरच्या रूपात लावावं.
 
8. खूप केस गळत असल्यास मेंदी गरम पाण्यात घोळून प्रत्येक दोन- तीन दिवसात केसांच्या मुळात लावावं.