testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

घरीच तयार करा हे जादुई तेल आणि केस गळतीपासून सुटकारा मिळवा!

Last Modified मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 (15:36 IST)
तुम्ही देखील केस गळतीमुळे त्रस्त आहात आणि परत दाट केसांची इच्छा बाळगत असाल आणि यासाठी प्राकृतिक उपायांचा शोध करत आहे तर घरी तयार केलेले तेल नक्कीच तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. 30 दिवसांमध्ये केस दाट होऊ लागतील.

कसे तयार कराल तेल
केसांसाठी हे अनमोल आणि उत्तम तेल बनवण्यासाठी तुम्हाला फक्त 5 गोष्टींची गरज आहे जी तुमच्या स्वयंपाकघरात नक्कीच मिळतील.

तेलासाठी साहित्य
लसणाच्या पाकळ्या - 6 ते 7
ताजे कापलेले आवळे - 2 ते 3
कापलेला कांदा - 1 लहान
कॅस्टर ऑयल - 3 चमचे
नारळाचे तेल - 4 चमचे

तेल तयार करण्याची विधी
केसांसाठी तेल तयार करण्यासाठी तुम्हाला एका बाऊलमध्ये नारळाचे आणि कॅस्‍टर ऑयल मिक्स करायचे आहे. नंतर तेलाच्या मिश्रणात कापलेले लसूण, कांदा आणि आवळा मिसळून या मिश्रणाला कमी आचेवर किमान पाच मिनिट शिजवावे. नंतर गॅस बंद करून किमान एक तास तसेच राहू द्या. तुमचे तेल तयार आहे.

तेल लावण्याची पद्धत
या तेलाला नियमित केसांना लावल्याने केसांची गळती कमी होण्यास नक्कीच मदत मिळेल. नवीन केस येऊ लागतील. केसांमुळे जर डोक्यावरची त्वचा दिसू लागली असेल तर नवीन केसांनी ती नक्कीच कव्हर होईल. त्याशिवाय केस दाट होण्यास हे तेल फारच फायदेशीर ठरेल. मग आता अजून उशीर न करता हे तेल तयार करा आणि महिन्याभरात त्याचे परिणाम बघा.


यावर अधिक वाचा :