सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 13 मे 2023 (21:53 IST)

Sun Protection Tips :उन्हाळ्यात समुद्रकिनाऱ्यावर त्वचेची काळजी घेण्यासाठी टिप्स

Sun Protection Tips :  उन्हाळा आला की शाळा बंद होतात. त्यामुळे लोक हँग आउट करण्याचे प्लॅन बनवू लागतात. या मोसमात तुम्ही हिल स्टेशनवर जात असाल तर ठीक आहे, पण जर तुम्ही समुद्रकिनाऱ्यावर जाण्याचा विचार करत असाल तर सूर्यापासून संरक्षण करणे खूप महत्त्वाचे आहे. खरे तर मे-जूनच्या कडाक्याच्या उन्हामुळे सगळेच अस्वस्थ होतात. विशेषत: जेव्हा आपण कुठेतरी बाहेर जातो तेव्हा सूर्यप्रकाश आणि धुळीमुळे त्वचा खूप खराब होते. अशा परिस्थितीत आपल्या त्वचेची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. 
 
उन्हाळ्यात समुद्रकिनाऱ्यावर त्वचेची काळजी घेण्यासाठी टिप्स -
 
सनस्क्रीन वापरा
तुम्ही समुद्रकिनारी सहलीला जात असाल तर तिथे सनबर्न होणे सामान्य गोष्ट आहे. पण, जर तुम्ही सनस्क्रीनचा योग्य वापर केला तर तुम्ही ही समस्या टाळू शकता. सनस्क्रीन तुमचा उन्हापासून संरक्षण तर करेलच, पण त्याचा वापर केल्याने तुम्ही टॅनिंगच्या समस्येपासूनही दूर राहाल.
 
पूर्ण कपडे परिधान करा
तुम्ही कुठे बाहेर जात असाल तर त्या वेळी पूर्ण कपडे घालण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने, सूर्याच्या तीव्र किरणांपासून तुमचे संरक्षण होईल. 
 
टोपी आणि चष्मा वापरा
समुद्रकिनाऱ्यावर चष्मा आणि टोपी घालण्यास कधीही विसरू नका. हे तुमचे डोळे आणि चेहरा उन्हापासून वाचवण्यास मदत करतील. 
 
स्वतःला हायड्रेटेड ठेवा
समुद्रकिनाऱ्यावर स्वतःला हायड्रेट ठेवा. उन्हात चालल्याने शरीरात पाणी कमी होत असल्याचे दिसून येते. अशा स्थितीत भरपूर पाणी पिण्याचा प्रयत्न करा आणि स्वत:ला हायड्रेट ठेवा. वेळोवेळी नारळाचे पाणी पीत राहा. यामुळे तुमची त्वचा निरोगी राहते.

Edited by - Priya Dixit