गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 26 नोव्हेंबर 2020 (17:24 IST)

हिवाळ्यात मॉइश्चरायझर लावण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

How to Moisturize Your Skin in the Winter
आपल्या त्वचेला फक्त हिवाळ्यातच नव्हे, तर सामान्य दिवसात देखील मॉइश्चरायझर लावण्याची गरज असते. हिवाळ्यात त्वचा कोरडी असते म्हणून या दिवसात त्वचेला मॉइश्झराईझ करण्याची गरज सर्वात जास्त असते. पण हे मॉइश्चरायझर लावण्याचे देखील काही नियम आहेत ज्यांना अवलंबवून आपण गुलाबी त्वचा मिळवू शकतो. जाणून घेऊ या कोणते आहे हे नियम.
 
1 मॉइश्चरायझर नेहमी आपल्या त्वचेला साजेशी निवडावं. आपली त्वचा तेलकट असल्यास सामान्य मॉइश्चरायझर आणि कोरडी त्वचा असल्यास तेल किंवा क्रीम असलेल्या मॉइश्चराइझरचा वापर करावा. त्यात एसपीएफ गुणवत्ता असल्यास उत्तम असेल. 
 
2 त्वचेवर सकाळ संध्याकाळ मॉइश्चरायझरचे थर लावणे योग्य नाही, या सह त्वचेची स्वच्छता राखणं देखील आवश्यक आहे. नाही तर त्वचेमध्ये असलेली घाण आणि तेलाचे अधिक प्रमाण असल्यामुळे मुरूम देखील उद्भवू शकतात. असे फेस वॉश वापरा जी त्वचेची घाण स्वच्छ करेल त्यामधील नैसर्गिक तेल नव्हे.
 
3 मॉइश्चरायझर नेहमी बोटांच्या मदतीने लावावे, या नंतर वर्तुळाकार मसाज करत लावा. या मुळे त्वचेला पोषण मिळतं आणि त्वचा तजेल होते.
 
4 फक्त चेहऱ्यावरचं नव्हे, तर गळ्यावर देखील मॉइश्चरायझर लावावे, जेणे करून गळ्याची त्वचा कोरडी आणि मृत दिसू नये. जास्तीचे लावलेले मॉइश्चरायझर टिशू पेपरने काढून टाकावे.
 
5 मॉईश्चराइझर लावण्यापूर्वी चेहऱ्याची स्वच्छता करावी. चांगल्या प्रतीचे टोनर लावल्यावरच त्वचेवर मॉइश्चरायझर वापरावे. या मुळे त्वचेला अंतर्गत पोषण मिळेल.