testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

वर्षातील फक्त पाच तासांसाठी उघडते निरई माता मंदिर

nirai mata mandir
Last Modified सोमवार, 19 सप्टेंबर 2016 (12:49 IST)
भारतात देवीदेवतांच्या मंदिरांची संख्या लक्षावधींनी असेल. या प्रत्येक देवळामागे काही ना काही इतिहास, कहाणी, रहस्य असतेच. प्रत्येक मंदिराची काही वैशिष्टय़ेही असतात.

छत्तीसगढच्या गरियाबंद जिल्ह्यातील सोदुल नदीच्या काठी मोहेरा येथील निरई पहाडावरील निरई माता मंदिरही याला अपवाद नाही. याचे वैशिष्टय़ म्हणजे हे मंदिर वर्षात एकदाच व तेही पाच तासांसाठीच खुले केले जाते. हे मंदिर म्हणायचे पण येथे मंदिरही नाही व मूर्तीही नाही.

पहाडात ही एक जागा आहे. तरीही लाखो श्रद्धाळू येथे निरई मातेच्या दर्शनाला येत असतात. मात्र या मंदिरातही महिलांना प्रवेश नाही तसेच देवीचा प्रसादही महिला घेऊ शकत नाहीत. प्रसाद खाल्ला तर काही तरी अघटित घडते असे लोकांचे अनुभव आहेत.
या देवीला बळी देण्याची प्रथा आहे. ज्या दिवशी मंदिर खुले होते तेव्हा अक्षरश: हजारो बकर्‍यांचे बळी येथे दिले जातात. हे बळी बोललेला नवस फेडण्यासाठी चढविले जातात असेही समजते.

चैत्री नवरात्राच्या दिवशी हे मंदिर खोलले जाते व तेथे आपोआप ज्योत प्रज्वलित होते व ती नऊ दिवस तेलाविनाच जळते असेही सांगितले जाते. या चमत्कारामुळे तर या देवीवर पंचक्रोशीतील भाविकांची अपार श्रद्धा आहे.

ही ज्योत कशी प्रज्वलित होते हे अद्यापिही न सुटलेले कोडे आहे. येथे लोक दर्शनासाठी येतात व नवस बोलतात. त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात असाही समज आहे. या देवीची जत्रा चैत्रात भरते. 200 वर्षापूर्वी जयराम गिरी गोस्वामी यांनी निरई मातेसाठी 6 एकर जमीन दान दिली होती.

तेथे शेती केली जाते व त्यातूनच या मंदिराचा खर्च भागविला जातो. या देवीला कुंकू, गुलाल, शृंगार साहित्य असे काहीही वाहिले जात नाही.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

शनिदेवाला नसून, महादेव आणि गणपतीला वाहतात शमीचे पानं

national news
आता श्रावण महिना सुरू होणार आहे. या महिन्यात महादेवाच्या पूजेचे खास महत्त्व असते. ...

महादेवाचे 108 नावे (अर्थासकट) : श्रावणात देतील पुण्य फल

national news
महादेवाचे अनेक नावे आहेत. ज्यातून 108 नावांचे विशेष महत्व आहे. येथे अर्थासकट नावे ...

देवघरात या दिशेत ठेवा मुरत्या

national news
घरात पूजेला विशेष स्थान प्राप्त असतं. जेव्हा देवघराची गोष्ट निघते तेव्हा सर्वांच लक्ष्य ...

श्रावण मास 2019: महादेवाचा पवित्र महिना, काय खरेदी कराल ...

national news
या वर्षी श्रावण मास 2 ऑगस्ट 2019 पासून सुरू होत आहे. श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी ...

वारी पंढरीची: गोंदवले ते पंढरपूर

national news
श्री. अमेय पद्माकर कस्तुरे

हे राम घोर कलयुग, मुलाने केली सख्या आईला बेदम मारहाण, हे ...

national news
आयुष्यभर पोटाला चिमटे देवून, मेहनत करत मुलाला वाढविल्यानंतर उतार वयात त्याने आपला सांभाळ ...

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी ...

national news
युवकांनी सीएसएमटीसमोर भीक मागून जमवलेली रक्कम मुख्यमंत्र्यांकडे करणार जमा करणार आहेत. ...

वर्ल्ड कप 2019: वेस्ट इंडिज हा देश नाही मग त्यांच्या ...

national news
इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरू आहे. स्पर्धेत दहा संघ आहेत. प्रत्येक मॅच सुरू होण्याआधी ...

गुगलने केले तीस लाख अकाऊंट बंद, त्यात तुमचे तर नाही ना ?

national news
जागतिक कंपनी इमेल सेवा, सर्च इंजिन सेवा देणारी कंपनी असलेल्या गुगलने आपल्या मॅप सेवेतून ...

ब्रायन लाराला काय झाले ? मुंबईच्या रुग्णालयात दाखल

national news
जागतिक क्रिकेट उत्तम खेळाडू म्हणून ओळख असलेल्या वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला ...