1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

सिम कार्ड साठी आता आधार गरजेचे नाही, वाचा कारण

business news
केंद्र  सरकारनं टेलिकॉम कंपन्यांना सद्य मोबाईल फोन ग्राहकांना किंवा नवं सिमकार्ड घेण्यासाठी आधार ई-केवायसी (e-KYC) लिंक करणं बंद करा असे महत्वपूर्ण  आदेश दिले.  सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर सरकारकडून निर्देश जारी करण्यात आले आहेत.   

न्यायालयानं गेल्या महिन्यात दिलेल्या एका महत्ताच्या निर्णयात खाजगी कंपन्यांना आधारचा वापर बंद करा,  आदेश दिले.  न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत दूरसंचार विभागानं दूरसंचार कंपन्यांसाठी विस्तृत दिशानिर्देश जारी केले आहेत. यानुसार, विशिष्ट ओळख संख्येच्या (आधार) माध्यमातून 'आपल्या ग्राहकांची ओळख' (ई-केवायसी) चा वापर थांबवण्याचे आदेश दिले आहेत. त्या बरोबर  कंपन्यांना या आदेशाच्या अनुपालनाचा अहवाल ५ नोव्हेंबरपर्यंत द्या असे स्पष्ट केले आहे.
आधारचा आता  ऑफलाईन त्याचा वापर करता येणार तेही ग्राहकाने दिले तर. आधारची सक्ती मात्र ग्राहकांना केली जाऊ शकत नाही.