शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 9 मार्च 2017 (17:18 IST)

लवकरच दहा रुपयांची नवी नोट चलनात येणार

लवकरच दहा रुपयांची नवी नोट चलनात येणार असल्याची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिली आहे. या नव्या नोटेत सुरक्षेसंबंधी काळजी घेण्यात आली असून जुन्या दहाच्या नोटेशी तुलना करता अत्यंत चांगली असल्याचं सांगितलं आहे. आरबीआय लवकरच महात्मा गांधी सीरीज 2005 च्या अंतर्गत 10 रुपयांची नोट जारी करणार आहे. आरबीआयने सांगितलं आहे की, नव्या नोटेच्या नंबर पॅनलवरील इनसेटमध्ये मोठ्या अक्षरात 'L' लिहिलेलं असेल आणि मागच्या बाजूला 2017 अ
सेल. या नोटेवर आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांची स्वाक्षरी असेल. 
 
 या नोटांच्या दोन्ही नंबर पॅनलवरील पहिले तीन अंक किंवा अक्षरांचा आकार स्थिर असेल, मात्र त्यानंतर डावीकडून उजवीकडे जाणा-या अंकांचा आकार वाढत्या क्रमाने असेल. आरबीआयने हेदेखील स्पष्ट केलं आहे की जुन्या दहा रुपयांच्या नोटादेखील वैध राहणार असून त्या वापरता येऊ शकतात.