1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 24 ऑगस्ट 2017 (17:02 IST)

शुक्रवारपासून दोनशे रुपयांची नोट बाजारात येणार

200 rs. note

दोनशे रुपयांची नोट शुक्रवारी बाजारात येणार आहे. याबाबत भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआयने ही माहिती दिली. केंद्र सरकारने दोनशे रुपयांची नोट बाजारात आणण्याची अधिसूचना नुकतीच जारी केली होती.

दरम्यान दोनशेच्या नोटेवर गव्हर्नर उर्जित पटेल यांची सही आहे. या नोटांची मोठ्या प्रमाणात छपाई सुरु आहे. बाजारात आल्यानंतर या नोटेचा तुटवडा जाणवू नये म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे. नऊ महिन्यात चलनात येणारी ही दुसरी नवी नोट आहे. यापूर्वी नोटाबंदीनंतर 8 नोव्हेंबर 2016 रोजी दोन हजाराची नोट आणण्याची घोषणा सरकारने केली होती.