मंगळवार, 21 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 30 जानेवारी 2019 (15:18 IST)

334 सीसी जावाचे बुकिंग सप्टेंबरच्या आसपास होणार सुरू

bobber custom is called Jawa Perak
जावा मोटारसायकलने गेल्या वर्षी दोन रेट्रो-क्लासिक मोटारसायकल्स जावा आणि जावा 42 सह भारतात पुनरागन केले. कंपनीने या दोन्ही बाइक्सच्या लाँचिंग दरम्यान जावा पेरकही सादर केली होती. तेव्हा बॉबर स्टाइल बाइक जावा पेरक काही काळानंतर बाजारात उपलब्ध होईल, असे कंपनीने स्पष्ट केले होते. आता जावा पेरकच्या बुकिंगच्या तारखांची माहिती समोर आली आहे. जावा बाइक्स तयार करणारी कंपनी क्लासिक लेजंड्‌सचे संस्थापक अनुपम थरेजा यांनी सांगितल्याप्रमाणे पेरकचे बुकिंग या वर्षाच्या अखेरीस सप्टेंबरच्या आसपास सुरू होईल. क्लासिक बॉबर थीम असलेल्या या बाइकची दिल्लीत एक्स शोरूम किंमत 1.89 लाख रुपये असणार आहे.