गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

निर्णय कठोर असल्यामुळे मोठा धक्का: मिस्त्री

मुंबई- टाटा उद्योगसमूहाच्या अध्यक्षपदावरुन अचानक हकालपट्टी करण्यात आल्याचा निर्णय कठोर असून त्यामुळे अत्यंत मोठा धक्का बसल्याचे सायरस मिस्त्री यांनी एका पत्राच्या माध्यमामधून म्हटले आहे. 
 
कॉर्पोरेट विश्वाच्या एकंदर इतिहासामध्ये या निर्णयासारखा दुसरा निर्णय सापडणे शक्य नसल्याची भावना व्यक्त करत मिस्त्री यांनी यासंदर्भात बोर्डावर टीका केली. याचबरोबर, बोर्डाची काम करण्याची पद्धत ही चुकीची व बेकायदेशीर असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. मिस्त्री यांनी यावेळी बोर्डाकडून काम करण्याचे स्वातंर्त्य मिळाले नसल्याचा आरोप केला.
 
अध्यक्षास कोणत्याही बचावाची संधी न देता अशाप्रकारे काढून टाकण्याची ही घटना कॉर्पोरेट विश्वाच्या इतिहासामधील एकमेव घटना असावी. बोर्डाच्या या कृतीमुळे टाटा समूहाच्या प्रतिष्ठेचे अमाप नुकसान झाले आहे. समूहामध्ये कॉर्पोरेट शासनव्यवस्थेचा असलेला पूर्ण अभाव आणि टाटा उद्योगसमूहामधील भागधारकांप्रती असलेले कर्तव्य पार पाडण्यामध्ये संचालकांना येत असलेले अपयश अधोरेखित करण्यासाठी मी हे पत्र लिहित आहे, असे मिस्त्री म्हणाले.