बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

जनतेने 365 दिवस दिले तरी परिणाम विफल: काँग्रेस

नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वकाही सुरळीत होण्यासाठी 50 दिवस मागितले होते, जनतेने 365 दिवस दिले तरी परिणाम विफल राहिला असा सरळ आरोप काँग्रेसने केला आहे. त्यांच्या हिशोबाने नोटाबंदीमुळे देशाला साडे तीन लाख कोटींचे नुकसान आणि 150 लोकांची मृत्यू झाली. याने देशाची विकास दर पडली. म्हणून काँग्रेस नोटाबंदीची वर्षगांठ काळा दिवस म्हणून साजरी करणार. काँग्रेस जिल्हाध्यक्ष नंदकिशोर पटेल यांनी ही माहिती देत सांगितले की जिल्हा आणि ब्लॉक स्तरावर नोटाबंदी विरोधात प्रदर्शन केले जाईल. 
 
सरकारने ब्लॅक मनी परत आणण्यासाठी नोटाबंदी लागू केल्याची घोषणा केली होती परंतू ब्लॅक मनीच्या नावावर सरकारने केवळ 16 हजार कोटीचा हिशोब दिला आहे. उलट सरकारने नोट छापण्याच्या नावाखाली 25.391 कोटी रुपये खर्च करून दिले. यामुळे देशाला आर्थिक नुकसान झेलावे लागले. नोटाबंदीमुळे ब्लॅक मनी बाहेर पडली नाही आणि काश्मिरामध्ये दहशतवादी घटनादेखील थांबल्या नाहीत. तरीही पीएम मोदी यांचे जुमले मात्र कमी झाले नाहीत.
 
नोटाबंदी आणि जीएसटीमुळे देशातील व्यवसायाचा गळा दाबला आहे. लहान व्यवसायी आणि दुकानदार हातावर हात धरून बसले आहेत. या सर्व प्रकरणांवर काँग्रेस जाब विचारणार असून देशभरात प्रदर्शन करेल.