पाकिस्तानने ईद मुबारक म्हटत भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र केले खुले

इंडिगोच्या फ्लाइट ऑपरेशन सेंटरला रात्री ईद मुबारक देत पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र खुले केले.

पाकिस्तानी सिव्हिल एव्हिएशन ऑथॉरिटीच्या संचालक यांनी
इंडिगोच्या अधिकाऱ्याला फोन करून, 'तुम्ही अजून जागे आहात का' असे विचारले. यानंतर ''मी फ्लाईट निरिक्षण करत आहे. विमान यशस्वीरित्या दिल्लीला उतरले आहे. तुम्हाला शब्द दिलेला. ईद मुबारक'', असा संदेश दिला.

बालाकोट हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानने हवाई क्षेत्र विमानोड्डानांसाठी बंद केले होते. आता अहमदाबादच्या जवळ टेलेम येथून भारतीय विमान पाकिस्तानात प्रवेश करु शकतात किंवा दुसर्‍या देशात जाऊ शकतात. इंडिगोच्या दुबईहून दिल्ली येणार्‍या फ्लाइयला या मार्गाने प्रवेश देण्यात आले होते.
यानंतर पाकिस्तानी अधिकाऱ्याने फोनवर 'शब्द दिलेला, ईद मुबारक', असे सांगत हवाई क्षेत्र भारतीय विमानांसाठी खुले झाल्याचा संदेश दिला.

भारताहून कोणतेही विमान युरोप-अमेरिका किंवा खाडी देशाकडे जातं तेव्हा पाकिस्तानाच्या 11 मार्गांहून प्रवेश करु शकतं. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने केलेल्या बालाकोट एअर स्ट्राईकच्या दुसऱ्या दिवशीच पाकिस्तानने 11 एन्ट्री पॉईंट बंद केले होते. यामुळे दक्षिण आशिया आणि पाश्चिमात्या देशांकडे जाण्यासाठी विमानांना वळसा घालून जावे लागत होते. तीन महिन्यांनंतर पाकिस्तानने पहिला टेलेम पॉईंट खुला केला. या मार्गावरून विमान भारतात पोहोचले. हा मार्ग खुला झाल्यानंतर सर्वप्रथम ऐतिहादच्या विमानाने रविवारी संध्याकाळी 5.34 वाजता अबुधाबी-दिल्ली उड्डाण केले.

इंडिगोच्या या फ्लाइटमध्ये 180 प्रवासी प्रवास करत होते. कंपनीने 14600 किलो इंधन भरवले होते कारण टेलमहून जाण्याची परवानगी मिळाली नाही तर इतर मार्गांकडे वळावे लागले असते.


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

Remove China Apps जोरात, रेटिंगही चांगले

Remove China Apps जोरात, रेटिंगही चांगले
भारतात चीनबद्दल मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. यातून बहिष्कार घालायला सुरुवात ...

मराठी विषय सक्तीचा, झाला मोठा करण्याचा निर्णय

मराठी विषय सक्तीचा, झाला मोठा करण्याचा निर्णय
राज्यात सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये मराठी हा विषय अध्यापनामध्ये ...

कोरोना संसर्गाच्या यादीत भारत सातव्या स्थानावर

कोरोना संसर्गाच्या यादीत भारत सातव्या स्थानावर
एका दिवसांत सर्वाधिक कोरोनाबाधितांचा आकडा वाढल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भारतात आता १ ...

प्रसिद्ध होमिओपॅथी डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू

प्रसिद्ध होमिओपॅथी डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू
गिरगावातील प्रसिद्ध होमिओपॅथी डॉक्टर आणि दळवी रुग्णालयाचे सेक्रेटरी डॉक्टर शशांक मूळगावकर ...

केरळमधून ५० हून अधिक डॉक्टर्स आणि नर्सेस मुंबईत येणार

केरळमधून ५० हून अधिक डॉक्टर्स आणि नर्सेस मुंबईत येणार
करोना व्हायरस विरुद्ध सुरु असलेल्या लढाईत मेडिकल स्टाफच्या मदतीसाठी पुढच्या काही दिवसात ...