मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 14 जानेवारी 2019 (08:56 IST)

सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत वाढ

consecutive day
कच्चा तेलाच्या किंमती वाढल्याने तेल विक्रेत्या कंपन्यांनी सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 69 रुपयांपेक्षा जास्त झाले आहेत. इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार मुंबईत गुरूवारी पेट्रोल 69.07 रुपये होते.  शुक्रवारी 74.72 रुपये इतके झाले होते. त्यानंतर आज पेट्रोल 75 रुपये प्रती लीटरने मिळत आहे. तर चेन्नईमध्ये पेट्रोलची किंमत 71.20 रुपयांवरून 71.67 इतकी झाली होती. आता चेन्नईत पेट्रोलची किंमत 72 रुपये प्रति लीटर झाली आहे.
 
कच्चा तेलाच्या किंमती घसरल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत आणखी वाढ होऊ शकते. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाची किंमत 60 डॉलरच्या पार पोहोचली आहे. गेले काही दिवस ही किंमत 50 डॉलर प्रति बॅलरच्या आसपास होती. त्यानंतर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी केल्या होत्या. 
=====================