Widgets Magazine
Widgets Magazine

ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये जीडीपी वाढीचा दर ७ टक्के

बुधवार, 1 मार्च 2017 (10:11 IST)

GDP

नोटाबंदीचा सकल राष्ट्रीय उत्पादनावर (जीडीपी) फारसा परिणाम झालेला नाही हे दर्शवणारी आकडेवारी जाहीर झाली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर २०१६ या तिमाहीतील सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) वाढीचा दर  ७ टक्के असल्याचे मंगळवारी जाहीर करण्यात आले. विशेष म्हणजे यात नोटाबंदीतून अर्थव्यवस्थेला बसलेल्या झळांचाही समावेश केला असल्याचे केंद्रीय सांख्यिकी संघटनेने म्हटले आहे.
 
अर्थ जगतामधील विश्लेषक संस्था आणि विविध अर्थतज्ज्ञांनी नोटाबंदीमुळे ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनामध्ये लक्षणीय घसरण होईल असा अंदाज वर्तवला होता. या तिमाहीत जीडीपी ६.५ टक्क्यांवर स्थिरावण्याची शक्यता वर्तवली जात होती. या पार्श्वभूमीवर केंद्रीय सांख्यिकी संघटनेने मंगळवारी जाहीर केलेली आकडेवारी मोदी सरकारला दिलासा देणारी आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर २०१६ या तिमाहीतील विकास दर ७ टक्के नोंदविण्यात आला आहे. यापूर्वीच्या तिमाहीत हा विकास दर ७.४ टक्के तर मागील आर्थिक वर्षातील तिमाहीत विकास दर ७.२ टक्के असा होता.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

अर्थजगत

news

देशभरात बँकांचा एकदिवसीय संप

विविध मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या (यूएफबीयू) नेतृत्वाखालील संघटनांनी आज ...

news

1 एप्रिलपासून 5 सहयोगी बँकांचं एसबीआयमध्ये विलिनीकरण

स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर, स्टेट बँक ऑफ मैसूर, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ ...

news

लातूर द्राक्ष उत्पादन घटले

लातूर जिल्ह्याला द्राक्षांच्या निर्यातीतून २०१० सालापूर्वी सुमारे ७० कोटी रुपये मिळायचे. ...

news

गोव्याचे राजभवन झाले कॅशलेस

पणजी- गोव्याचे राजभवन सोमवारपासून कॅशलेस झाले असून राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी पहिला ...

Widgets Magazine