Widgets Magazine
Widgets Magazine

सोन्याच्या दरात 990 रुपयांची वाढ

Last Modified शनिवार, 9 सप्टेंबर 2017 (17:13 IST)

आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे

Widgets Magazine
सोन्याच्या दरात या वर्षातली सर्वात मोठी 990 रुपयांची वाढ झाली आहे. सोनं तब्बल 31 हजार 350 रुपयांवर पोहोचलं आहे. याआधी नोव्हेंबर 2016 मध्ये सोन्याचे दर 31 हजार 200 रुपयांवर पोहोचले होते.

सोन्याच्या दरवाढीमागे उत्तर कोरियाची बॉम्ब चाचणी हे कारण आहेच. सोबतच भारत आणि दक्षिण कोरियामध्ये झालेल्या
करारामुळे भारताने कोरियातून सोन्याची नाणी आयात केली तर त्यावर इम्पोर्ट ड्यूटी लागत नाही. मागील दोन महिन्यात दहा टन नाणी आयात झाली आहेत. शिवाय त्यावर जीएसटीही लागत नव्हता. त्यामुळे सोन्याचा दर कमी होता.
व्यापाऱ्यांनी हे सोनं बाजारात आणून ते वितळवलं. परंतु सरकारला अपेक्षित महसूल मिळाला नाही. तसंच दीड महिन्यानंतर ही आयात बंद झाल्याने सोन्याचे दर वधारले आहेत.


Widgets Magazine

यावर अधिक वाचा :