शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शनिवार, 8 फेब्रुवारी 2020 (15:36 IST)

रुपया घसरल्यामुळे सोने झाले महाग

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये घसरण आल्यामुळे घरगुती बाजारात सोने महाग झाले आहे. सोन्याचे भाव 112 रुपये प्रतितोळा वाढले. त्याचवेळी चांदीच्या किमतींमध्येही तेजी आली. एक किलो चांदीचे भाव 94 रुपयांनी वाढले. दिल्लीच्या सराफ बाजारात सोन्याची किंमत 41 हजार 249 रुपये  प्रतितोळा झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत 1 हजार 566 डॉलर प्रतिऔंस झाली.