बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

सोन्याच्या किमतीत घसरण, मागणीही कमी

आंतरराष्ट्रीय स्तरावर रुपया मजबूत झाल्यानं सोन्याच्या किमतीत घसरण झालीय. दिल्लीत 10 ग्रॅम सोन्याचा दर 121 रुपये कमी झालाय. चांदी 851 रुपये स्वस्त झालीय. एक किलोग्रॅम चांदी 851 रुपयांनी स्वस्त झालीय. सध्या पितृपक्ष सुरू असल्यानं सोन्याची मागणी कमी झालीय. 
 
दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव 121 रुपये कमी होऊन 38,564 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. गुरुवारी सोन्याचा भाव 497 रुपयांनी कमी होऊन 10 ग्रॅम सोन्याची किंमत 38,685 रुपये झाली होती. सोन्याप्रमाणे चांदीही स्वस्त झाली. 1 किलोग्रॅम चांदीची किंमत 47,235 रुपयांवरून 46,384 रुपये झालीय. तज्ज्ञांच्या मते सध्या पितृपक्ष असल्यानं सोन्याची खरेदी होत नाहीय. मागणी कमी झाल्यानं किंमतही कमी झाल्या आहेत.