मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 20 डिसेंबर 2023 (15:28 IST)

आज देशभरात सोन्या-चांदीच्या किमती वाढल्या

Gold Silver Price Today 20 December 2023
आज म्हणजेच 20 डिसेंबर रोजी देशभरात सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत तुम्ही सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सोने आणि चांदी खरेदी करण्यापूर्वी, आज सोने आणि चांदी कोणत्या किंमतीला विकली जात आहे याचा विचार करा. यावरून आज सोने-चांदी खरेदी करणे तुमच्यासाठी फायदेशीर आहे की नाही याची कल्पना येईल.
 
Latest Gold Rate In India
देशात 24 कॅरेट सोन्याची किंमत (Gold Rate) 370 रुपये अर्थात 0.60% वाढून 62,450 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहचली आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत (Gold Price Today)57,200 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे. चांदी (Silver Price) महागली आहे. चांदीची किंमत 0.41% अर्थात 300 रुपये प्रतिकिलो वाढून 74,000 रुपये प्रतिकिलो झाली आहे.
 
देशातील सर्व महानगरांमध्ये सोनं-चांदी रेट(Gold Silver Rates)
दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा दर 63,150 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याचा दर 57,900 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
 
मुंबईत 24 कॅरेट सोने 63,000 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 22 कॅरेट सोने 57,750 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले जात आहे.
 
चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 52,285 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 47,927 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
 
कोलकातामध्ये 24 कॅरेट सोने 63,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 22 कॅरेट सोने 57,750 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने उपलब्ध आहे.
 
मल्‍टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याची किंमत
मल्‍टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोन्याच्या किमतीत (Gold Rate Today) वाढ दिसत आहे. आज MCX वर सोनं 62533.00 रुपये प्रति 10 ग्रॅम. नंतर दुपारी 2 वाजेच्या सुमारास एमसीएक्सवर सोनं (Gold Rate) 59.00 रुपये (2.31%) वाढीसह 62535.00 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवसाय करत आहे.
 
मल्‍टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर चांदी 74951.00 रुपये प्रतिकिलो पातळीवर उघडली असून दुपारी 2 वाजेच्या सुमारास चांदीची किंमत (Silver Rate) 136.00 रुपये (0.18%) वाढून 74960.00 रुपये प्रतिकिलो झाली आहे.