1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 मे 2020 (12:01 IST)

भन्नाट ऑफर, या कंपनीची स्कूटर खरेदी केल्यानंतर आवडली नाही तर परत करता येईल

Hero Electric announced three days return scheme
लॉकडाऊनमध्ये ऑटो इंडस्ट्रीची भलतीच वाट लागली असून काही काळ तरी या क्षेत्रात फायद्या होण्याची चिन्हे दिसत नसल्याने कंपनींसमोर आता प्रश्न आहे की कशा प्रकारे ग्राहकांना आकर्षित करावे. या कारणामुळेच कंपन्यांनी वेगवेगळ्या स्कीम आणायला सुरुवात केली आहे. 
 
एका आगळीवेगळी ऑफर हिरो कंपनीने दिली आहे. जर हिरोची स्कूटर खरेदी केल्यानंतर तुम्हाला आवडली नाही तर ती तुम्ही तीन दिवसात परत करू शकता. 
 
यापूर्वी कंपनीने इलेक्ट्रिकच्या काही निवडक उत्पादनांवर सूट दिली होती. तसेच कंपनी अनेक मॉडेल्सवर 3 ते 4 हजार रुपयांची तात्काळ सूट देत आहे. कंपनीने बुकिंग रक्कम 2,999 रुपये ठेवली आहे. कंपनीप्रमाणे इलेक्ट्रिक मोबिलिट तंत्रज्ञान लोकांच्या पसंतीस उतरले आहे.