testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

गृहकर्जासह इतर कर्जांवरील व्याजदरात बदल नाही

Last Modified बुधवार, 7 जून 2017 (17:29 IST)

भारतीय रिझर्व्ह बॅंकेकडून द्वैमासिक पतधोरण जाहीर करण्यात आलं आहे. या पतधोरणात रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे आधीचा रेपो रेटच कायम राहणार आहे. आधी 6.25 टक्के इतका रेट होता आताही तोच रेट कायम राहणार आहे. तर रिव्हर्स रेपो रेटसुद्धा कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सध्यातरी गृहकर्जासह इतर कर्जांवरील व्याजदरात कोणता बदल होण्याची शक्यता नाही.

याशिवाय सीआरआरही चार टक्क्यांवर कायम ठेवला आहे. आरबीआयच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीने मुद्रांकाच्या केलेल्या समिक्षा आणि एकूण पडताळणीनंतर हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आरबीआयचा व्याजदर गतवर्षी प्रमाणे जैसे थेच आहे.यावर अधिक वाचा :