शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

गृह व्याज दर कमी करण्याचा मोठा निर्णय

शहरी भागात पहिलं घर खरेदी करण्यासाठी घेतलेल्या कर्जावर सवलत मिळणार आहे. नोटाबंदीनंतर केंद्र सरकारनं गृह व्याज दर कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला. जर तुम्ही पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरात पहिलं घर घेत असाल आणि तुमचं वार्षिक उत्पन्न 12 ते 18 लाखांच्या दरम्यान असेल, तर 9 ते 12 लाखांपर्यंतच्या कर्जावर केवळ 3 ते 4 टक्के व्याज दर आकारला जाईल. म्हणजेच 9 ते 12 लाखांपर्यंतच्या गृहकर्जावर 2 हजार रुपयांची बचत होईल. 70 कर्जपुरवठा संस्था, 45 हाऊसिंग फायनान्स कंपन्या, 15 शेड्युल बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका आणि सहकारी बँका इत्यादींनी केंद्राच्या या योजनेच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेतला आहे.
 
मध्यम उत्पन्न गटासाठी फायदेशीर ठरणारी केंद्र सरकारची गृहकर्ज व्याज सवलत योजना 1 जानेवारीपासूनच्या कर्जांवर लागू होईल. त्यामुळे 1 जानेवारी 2017 पासून गृह कर्ज घेतलेल्यांनाच याचा फायदा मिळेल. 1 जानेवारीपासून गृहकर्जासाठीचा अर्ज विचाराधीन आहे, तेही या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यम उत्पन्न गटासाठी 31 डिसेंबर 2016 रोजी गृहकर्ज व्याज सवलत योजनेची घोषणा केली होती.