मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

गृहकर्जाच्या व्याजदरात कपात

गृहकर्ज व्याजदरात कपात
एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेनं आपल्या गृहकर्जाच्या व्याजदरात कपात केली आहे.

आयसीआयसीआयनं  गृहकर्जाच्या व्याजदरात 30 बेसिस पॉईंट म्हणजेच 0.30% कपात केली आहे. तर एचडीएफसीनं 0.15% कपात केली आहे. याआधी भारतीय स्टेट बँकेनं देखील गृह कर्जाच्या व्याजदरात कपात केली होती. ज्या महिलांचं सॅलरी अकाउंट आयसीआयसीआय बँकेतील आहे त्यांना 30 लाखापर्यंतचं होम लोन 8.35% ने मिळणार आहे.

म्हणजेच महिलांसाठी गृहकर्ज स्वस्त असणार आहे. एचडीएफसीनं महिला ग्राहकांसाठी होम लोन 8.35% केलं आहे तर पुरुष ग्राहकांसाठी 8.40% आहे.