शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 30 ऑक्टोबर 2019 (09:07 IST)

वेळीच सुधार करा, राज्यातील या दोन बँकांनवर रिझर्व बँकेची कारवाई

पीएमसी बँकेच्या घोटाळ्याने अनेकांचे पैसे बुडाले, दिवाळी अंधारात गेली सोबतच अनेकांना आपले जीव गमवावे लागले. त्यामुळे आता आरबीआय ने कामात अनियमितपणा दाखवनाऱ्या दोन बँकांवर कारवाई केली असून, दोन्ही सहकारी बँका राज्यातील आहेत. आर्थिक अनियमिततेमुळे पंजाब-महाराष्ट्र बँकेवर रिझर्व्ह बँकेने घातलेल्या निर्बंधांमुळे हजारो ठेवीदार अडचणीत आलेले आहेत. या कारवाईला काही दिवस उलटत नाहीत तोच  देशातील सर्वोच्च बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आता राज्यातील अजून दोन सहकारी बँकांवर मोठी कारवाईला सुरुवात केली आहे. या मध्ये नियमांचा भंग केल्याने रिझर्व्ह बँकेने पुण्यातील जनता सहकारी बँक आणि जळगावमधील जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक या बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
 
रिझर्व्ह बँकेने नियमांचा भंग केल्याचा ठपका ठेवत पुण्यातील जनता सहकारी बँकेला एक कोटी रुपयांचा दंड सुनावला आहे. सोबतच  जनता सहकारी बँकेने मिळकत ओळख आणि मालमत्ता वर्गीकरण (आयआरएसी) निकष, प्रगती आणि एक्सपोजर मानदंड आणि वैधानिक / इतर निर्बंधांचे उल्लंघन केल्याचा ठपका रिझर्व्ह बँकेने ठेवला आहे.त्याशिवाय जळगावमधील जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेला २५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.