शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 जुलै 2020 (21:45 IST)

'या' देशासाठी विमान उड्डाण सुरु होणार

फ्रान्स आणि अमेरिका या दोन्ही राष्ट्रांसह भारताकडून द्विपक्षीय करार करण्यात आले आहेत. याअंतर्गत शुक्रवापासून आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाच्या निमित्तानं विमानानंची उड्डाणं सुरु होत आहेत. सिव्हील एविएशन खात्याचे केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार जर्मनी आणि ब्रिटन यांच्यासहसुद्धा अशा प्रकारचे द्विपक्षीय करार प्रस्तावित आहेत. 
 
अमेरिकेच्या युनायटेड एअरलाईन्सच्या वतीनं भारत आणि अमेरिकेदरम्यान, १७ जुलै ते ३१ जुलै या काळात एकूण १८ उड्डानं आकाशात झेपावणार आहेत. तर, १८ जुलै ते ते १ ऑगस्ट या काळात फ्रान्सकडून दिल्ली, मुंबई, बंगळुरूच्या दिशेनं येणाऱ्या २८ उड्डाणांची सुरुवात केली जाणार आहे. युकेसोबत अशा प्रकारचा करार शक्य  तितक्या लवकर करत दर दर दिवशी लंडन आणि दिल्ली दरम्यान, दोन उड्डाणांच्या सुविधेचा प्रस्ताव असल्याचं ते म्हणाले.  पुरी यांच्या माहितीनुसार इतरही देशांकडून 'एअर बबल'साठीची विचारणा होत आहे. असं असलं तरीही आपल्याला या घडी हाताळता येतील तितक्याच प्रवाशांना अनुमती देण्याची बाब त्यांनी अधोरेखित केली.