मंगळवार, 26 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 8 एप्रिल 2021 (10:14 IST)

भारताचा विकासदर 12.5 टक्के राहील

India's growth rate will be 12.5 per cent
भारतीय अर्थव्यवस्था आता कोरोना संकटातून सावरली आहे. उद्योगधंदे हळूहळू सावरत असून 2021 मध्ये भारताचा विकासदर विक्रमी 12.5 टक्के इतका असेल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केला आहे. ‘जीडीपी'च्या बाबतीत भारत चीनवर मात करेल, असा विश्वास नाणेनिधीने व्यक्त केला आहे.
 
2020 मध्ये कोरोना संकटामुळे भारताचा ‘जीडीपी' उणे 8 टक्क्यांपर्यंत घसरला होता. भारतातील आर्थिक व्यवहार सुरळीत झाले आहेत. बाजारपेठा पूर्वपदावर येत असल्याचे मागील काही महिन्यात दिसून आले असल्याचे नाणेनिधीच्या अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी सांगितले. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आढाव्या  नुसार जीडीपीबाबत नाणेनिधीने 1 टक्का वाढ केली असल्याचे त्यांनी सांगितले.