testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

जलयुक्त शिवार अभियानाचे आणखी एक वर्ष

construction
आज जसजसे आपण पुढे जातोय तसे मानवाच्या आरोग्यासोबत जमिनीचे आरोग्य धोक्यात आलेय, अत‍िरिक्त रसायन वापर व घसरत्या जमिनीचा पोत यामुळे एके काळीच्या `सुजलाम सुफलाम ' धरणीला दुष्काळाचे भयंकर स्वरूप प्राप्त झाले. दुष्काळ ही निसर्गाने मानवाला दिलेले दुखणे नाही तर मानवाने स्वतःहुन ओढवून घेतलेल्या असह्य वेदनेचे कारण बनले. संपूर्ण महाराष्ट्र आज दुष्काळ या समस्येने ग्रासलेले राज्य असताना मुख्यमंत्रयांनी जलयुक्त शिवार अशियान राबवले. आणण त्याचे उत्तम परिणाम आज महाराष्ट्र अनुभवत आहे.
मानवाच्या शरीरात ७० टक्के भाग व्यापून टाकणारा स्त्रोत म्हणजे पाणी, तेव्हा पुन्हां एकदा पर्यावरण स्नेही बनून आपल्या उद्याची गरज ओळखून ने काही महत्वपूर्ण उपक्रम राबविले व त्यातून खूप काही गोष्टी साध्य केल्यात. जलयुक्त शिवार अभियान, हे त्यातलेच एक.
राज्याच्या काही भागात दर एक दोन वर्षांनी पडणार्‍या दुष्काळावर मात करण्यासाठी यांनी हि योजना राबवण्याचे तंत्र जोपासले. या जलसंधारणांगर्त सर्वसमावेशक उपाययोजनेद्वारे एकात्मिक पध्दतीने शाश्वत शेतीसाठी पाणी व पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिलेले आहे. या अशियानाची प्रमुख उद्दीष्टे अशी की पावसाचे पाणी गावाच्या शिवारात अडविणे, भुगर्भातील पाणी पातळीत वाढ करणे, राज्याच्या सिंचन क्षेत्रात वाढ करुन शेतीसाठी संरक्षित पाणी व पाण्याच्या वापराच्या कार्य क्षमतेत वाढ करणे, सर्वांना पुरेसें पाणी उपलब्ध करण्याची शाश्वता निर्माण करणे, आस्तित्वात असलेलें व निकामी झालेले बंधारे, गांव, तलाव, पाझर तलाव, सिमेंट बंधारे आदिची साठवण क्षमता वाढविणे यांचा समावेश होतो. अशा कामकाजांची सुरुवात सुलाने मे 2016 ला सुरुवात केली त्यातील बरीच उपक्रम आज पूर्ण झालेली बघायला मिळतात. गंगापुर धरणातून २८८ ट्रक गाळाचा उपसा करून २५ लक्ष लिटर पाण्याची क्षमता वाढवली आहे. सावरगाव येथील पाझर तलावासाठी ६४ लक्ष लिटर पाण्याची क्षमता वाढवली आहे. त्यातुन ६४३ ट्रक इतका वाळूचा उपसा करण्यात आला.
गेल्या वर्षी `जलयुक्त शिवार अभियान' योजना निफाड तालुक्यातील महाजनपुर, भेंडाळी, औरंगपूर या गावांत योजली गेली त्यामुळे ३४७ लाख लिलटर पाण्याचे क्षेत्र वाढले. यामुळे वर्षभर पाणी टंचाई पासून बचाव होणे शक्य झाले. तसेच जमीनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढली. याचा फायदा भविष्यात जमिनीचा पोत नियमित ठेवण्यासाठी झाला. मागील वर्षात एकूण १२ लाख रु खर्च करून सुमारे ५०० लाख लिलटर पाण्याचे क्षेत्र वाढले. सुमारें ४३९३ ट्रक इतक्या मोट्या प्रमाणावर गाळाचा उपसा करून जलसंवर्धनाचे काम पार पडले.
गेल्यावर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा सुलाने आपल्या सी एस आर उप्रमाअंतर्गत सावरगाव पाझर तलावाच्या गाळाचा उपसा करण्यास सुरुवात केली आहे. नाशिकचे विद्यमान कलेक्टर श्री राधाकृष्णन यांच्या पुढाकाराने राबविण्यात येत असलेल्या 'जलयुक्त शिवार योजने'चा 'गाळ उपसा प्रकल्प' हा एक महत्वाचा भाग आहे. आता हा प्रकल्प पूर्णत्वकडे वाटचाल करत असून आत्तापर्यंत ३७७८ क्युबिक मीटर माती काढली गेलेली असून, हा उपक्रम साधारण ११ जून पर्यंत चालू राहणार आहे. याद्वारे ४० लाख लिटर पर्यंत पाणी साठवण क्षमता वाढवली जाईल. पाउस पाण्याच्या सुरुवातीलाच काम पूर्ण होत असल्याने या उपक्रमाचा फायदा सावरगावाला होणार आहे.


यावर अधिक वाचा :

केरळमध्ये पसरला 'निपाह' आजार, हाय अलर्ट जाहीर

national news
केरळमध्ये अत्यंत दुर्मिळअशा निपाहच्या विषाणूंच्या संसर्गामुळे होणाऱ्या महाभयंकर आजाराने ...

पोलीस शिपायाने चक्क ३ लग्नं केली पुण्यातील गोष्ट

national news
पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्यांतर्गत सेवेत असलेल्या या पोलीस शिपायाने चक्क ३ लग्नं केली ...

सायन रूग्णालयातील निवासी डॉक्टरही आजपासून संपावर

national news
मुंबई येथील जे जे रुग्णालयात डॉक्टरला बेदम मारहाण प्रकरणी आता सायन रूग्णालयातील निवासी ...

विधार्भात पाणी प्रश्न पेटला जीवण प्राधिकरणच्या एका ...

national news
पाण्यासाठी नागरिकांचा उद्रेक झालाय. वडगाव चौकात पाणीटंचाईच्या प्रश्नातून जीवण ...

कुमारस्वामींचे लग्न झाले तेव्हा दुसरी पत्नी आली होती

national news
कर्नाटकचे संभाव्य मुख्यमंत्री व जेडीएसचे नेते एचडी कुमारस्वामी यांच्यापेक्षा लोकांना ...

Moto G6 भारतात 4 जूनला होईल लाँच, अमेजनवर होईल याची विक्री

national news
लेनोवो स्वामित्व असणारी कंपनी मोटोरोला आपला नवीन स्मार्टफोन लाँच करत आहे ज्याचे नाव आहे ...

आंतरराष्ट्रीय कूपन कोड कंपनी पिकोडी, आता भारतात

national news
इंटरनेटवर सर्वात फायदेशीर ऑनलाईन डील आणि कूपन सर्च मध्ये उत्कृष्ट प्रदर्शन देणारी ऑनलाईन ...

बीएसएनएलचा 'डेटा त्सुनामी' प्लान

national news
बीएसएनएल (BSNL)ने नवा प्लान जाहीर केलाय. जियो आणि एअरटेलला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलने ...

एअरटेल - अमेझॉनचा करार, मिळणार २,६००चा कॅशबॅक

national news
एअरटेल आणि अमेझॉन इंडियाने मिळून ४ जी स्मार्टफोन खरेदीवर कॅशबॅक ऑफर आणली आहे. या ऑफरसाठी ...

डिसेंबर 2019 पर्यंत भारतात 5 जी सेवेची शक्यता

national news
येत्या काही दिवसात 5 जीचे निकष निश्चित करण्याचा ट्रायचा प्रयत्न करणार असून डिसेंबर 2019 ...