शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 30 जून 2022 (14:59 IST)

मनमाड – कुर्ला गोदावरी समर एक्सप्रेसला मुदतवाढ

AC train
कोरोनामुळे अडीच वर्षे बंद असलेली मनमाड- कुर्ला गोदावरी एक्सप्रेस तीन महिन्यापूर्वी समर एक्सप्रेस म्हणून सुरू झाली. नाशिक जिल्ह्यातील प्रावाशांची जीवणवाहिनी समजल्या जाणाऱ्या मनमाड – लोकमान्य टिळक टर्मिनस गोदावरी एक्स्प्रेसला पर्याय म्हणून सुरू करण्यात आलेल्या मनमाड – छत्रपती शिवाजी महाराज समर स्पेशल एक्स्प्रेसला रेल्वे प्रशासनाने पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढ दिली असून आता ही गाडी ३० सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे प्रवाशी व चाकरमान्यांची गैरसोय दूर झाली असून ही गाडी कायम सुरू राहावी अशी मागणी प्रवासी संघटनेसह प्रवाशांकडून होत आहे.