ATM मधून आता 1 एप्रिलपासून 2000 च्या नोटा गायब होणार?

Last Modified शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020 (10:44 IST)
इंडियन बँकेने (Indian Bank) आपल्या एटीएम मधून 2000 रुपयांच्या नोटा पुरवणे बंद करून त्याऐवजी कमी मूल्याच्या नोटा ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर काही दिवसांपासून बाजारातून पूर्णतः 2000 च्या नोटा बंद केल्या जाणार अशा चर्चा होत्या. मात्र यावर आता स्वतः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी स्पष्टीकरण देत, केंद्र सरकार तर्फे बँकांना असे कोणतेही आदेश देण्यात आले नाही असे सांगितले आहे. दोन हजार रुपयांच्या नोटांचे सुट्टे करणे खूपच अवघड जाते. केवळ एवढ्याच कामासाठी लोक बँकेत गर्दी करतात त्यांचा हा त्रास कमी करण्यासाठी दोन हजार रुपयांच्या नोटांची संख्या कमी करण्यात येणार असल्याचे म्हंटले जात होते. माध्यमांच्या माहितीनुसार, 2000 रुपयांच्या नोटांची एटीएम मधील जागा आता कमी होण्यास सुरुवात झाली असून ज्या ट्रे मध्ये या नोटा ठेवल्या जातात त्याजागी 100 आणि 200 रुपयांच्या नोटा भरण्यात येत आहेत अशाही चर्चा होत्या मात्र या सर्व मुद्द्यांना सीतारामन यांनी पूर्णविराम दिला आहे.
वास्तविक गेल्या वर्षी एका RTI च्या प्रश्नावर उत्तर देताना रिझर्व्ह बँकेने दोन हजारांच्या नोटांची छपाई बंद करण्यात आल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषद घेऊन 2000 रुपये मूल्याच्या नोटांचे व्यवहारातील प्रमाण कमी होत असल्याच्या वृत्ताचे खंडन केले होते. त्यानंतर इंडियन बँकेच्या घोषणेनंतर पुन्हा एकदा 2000 च्या नोटा बंद होणार असल्याच्या चर्चा होत्या.

दरम्यान, सार्वजनिक बँक क्षेत्रातील इंडियन बँक ने आपल्या 40,000 एटीएममध्ये 2000 रुपयांच्या नोटा टाकणे बंद करण्यात आल्याचे स्पष्ट केले आले आहे. हा संस्थेचा निर्णय असून या निर्णयाची अंमलबजावणी येत्या 1
मार्चपासून करण्यात आली आहे. इंडियन बँकेच्या एटीएममध्ये 2000 रुपयांऐवजी आता 100 , 200 आणि 500 रुपयांच्या नोटा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

गँगस्टर दाऊद इब्राहिमला करोनाची लागण

गँगस्टर दाऊद इब्राहिमला करोनाची लागण
गँगस्टर दाऊद इब्राहिमला करोनाचा संसर्ग झाल्याचे वृत्त येत आहे. दाऊदबरोबरच त्याच्या ...

भयंकर, दोघांचे मृतदेह बारमधील पाण्याच्या टाकीत टाकले

भयंकर, दोघांचे मृतदेह बारमधील पाण्याच्या टाकीत टाकले
मुंबईतील मीरारोडमधील एका बारमध्ये दुहेरी हत्याकांड घडले आहे. एका बारमध्ये दोन ...

पॅकेज नाही तर नुकसानग्रस्तांसाठी १०० कोटींच्या मदतीची घोषणा

पॅकेज नाही तर नुकसानग्रस्तांसाठी १०० कोटींच्या मदतीची घोषणा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निसर्ग वादळाचा फटका बसलेल्या रायगडमधील नुकसानग्रस्तांसाठी ...

बाप्परे, कोरोनाची चाचणी करून बनावट रिपोर्ट दिले

बाप्परे, कोरोनाची चाचणी करून बनावट रिपोर्ट दिले
मुंबईत ६५ वर्षीय कॅन्सरग्रस्त रुग्णाची कोरोनाची चाचणी करून बनावट रिपोर्ट दिल्याची घटना ...

रिलायन्स जिओने इलेक्ट्रॉनिक्सपासून ते कपड्यांपर्यंत, आकर्षक ...

रिलायन्स जिओने इलेक्ट्रॉनिक्सपासून ते कपड्यांपर्यंत, आकर्षक सवलतीत 4X लाभ सादर केला
यावेळी रिलायन्स जिओ (Reliance Jio) ने आपल्या वापरकर्त्यांसाठी एक अतिशय खास आणि आकर्षक ऑफर ...