शुक्रवार, 22 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 12 जानेवारी 2021 (22:20 IST)

उस्मानाबादच्या वसंतदादा नागरी सहकारी बँकेचा परवाना रद्द

Osmanabad's Vasantdada Nagari Sahakari Bank's license revoked
उस्मानाबाद येथील वसंतदादा नागरी सहकारी बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेकडून रद्द करण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेकडून परवाना रद्द करण्यात आला आहे. 
 
यावेळी उस्मानाबादच्या वसंतदादा नागरी सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्यात येत असल्याची घोषणा रिझर्व्ह बँक (आरबीआय) केली आहे. यासह बँकेची जी सध्याची स्थिती आहे, त्यात बँक ग्राहकांची देणी देण्यात किंवा व्यवहार करण्यास असमर्थ असल्याचे आरबीआयने म्हटंल आहे. आता बँकेला व्यवहार करण्यास मनाई करण्यात आली आहे.
 
आरबीआयच्या कारवाईनंतर देखील ठेवीदारांची ५ लाखापर्यंतची रक्कम सुरक्षित आहे. त्यामुळे या बँकेतील ९९ टक्के खातेदारांचे पैसे परत दिले जाणार आहेत. आरबीआयने महाराष्ट्राच्या कमिशनर फॉर कॉर्पोरेशन आणि रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीला आदेश दिले आहे. या दिलेल्या आदेशानुसारच  बँकेचे कामकाज बंद केले जाणार आहे.