गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 जून 2017 (10:51 IST)

यापुढे पेट्रोल-डिझेलचे दर दररोज बदलणार

देशातील  इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या महत्वांच्या कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर दररोज बदलण्याचा निर्णय घेतला आहे.   
 
भारतातील सर्व तेल कंपन्या 16 जूनपासून देशभरात रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा आढावा घेणार आहेत. इंधनाच्या व्यवहारात जास्त पारदर्शकता यावी, दरातील चढ-उताराचा ग्राहाकांना फटका बसू नये, या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचं ऑईल कंपन्यांकडून सांगण्यात येत आहे. दररोज बदलणारे पेट्रोल आणि डिझेलचे दर एसएमएस द्वारे सर्वांना कळवण्याचा पेट्रोल कंपन्यांचा विचार आहे. यापुर्वी 1 मेपासून  पुदुच्चेरी,उदयपूर, आंध्र प्रदेशमधील विझाग, जमशेदपूर आणि चंदीगड या पाच शहरांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर पेट्रोल, डिझेलचे दर प्रत्येक दिवशी बदलले जात होते. पेट्रोलियम पदार्थाच्या दरामध्ये रोज बदल करण्याची शिफारस तज्ज्ञांच्या समितीने केली होती.