मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 2 जानेवारी 2017 (11:01 IST)

नववर्षात पेट्रोल,डिझेल गॅस सिलिंडर महागले

नववर्षाचे स्वागत जल्लोषानंतर पेट्रोल 1.29 पैशांनी तर डिझेल प्रतिलिटर 97 पैसे अनुदानित गॅस सिलिंडर 2 रुपयांनी महागले आहे. मध्यरात्रीपासूनच नवे दर लागू झाले आहेत.पंधरा दिवसांपूर्वीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली होती. अनुदानित सिलिंडरच्या दरात सलग आठव्या महिन्यात दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ग्राहकांना आता 14.2 किलोचा अनुदानित सिलिंडर 434.71 रुपयांना उपलब्ध होणार आहे. सरकारने अनुदानाचा भार कमी करण्यासाठी जुलै महिन्यात सिलिंडरच्या किंमती दोन रुपयांनी वाढविण्याचा निर्णय घेतला होता. याआधी 1 डिसेंबर रोजी एलपीजीचे दर 2.07 रुपयांनी वाढविण्यात आले होते. सोबतच 14 सिलिंडरची मर्यादा पूर्ण झाल्यानंतर खरेदी करण्यात येणार्‍या अनुदानित सिलिंडरची किंमत एक रुपयाने वाढविण्यात आली आहे. अनुदानित सिलिंडरची रक्कम 585 रुपये एवढी झाली आहे.