1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 23 सप्टेंबर 2021 (09:59 IST)

Petrol Price Today : सलग 18 व्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर वाढले नाहीत

petrol diesel
आज पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. सरकारी तेल कंपन्यांनी गुरुवारी सलग 18 व्या दिवशी किमती स्थिर ठेवल्या आहेत. 5 सप्टेंबर रोजी तेल कंपन्यांनी 15 पैशांची कपात केली होती. तेव्हापासून किंमतीमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही किंवा कोणताही दिलासा मिळालेला नाही.
 
IOCL च्या मते, देशाची राजधानी दिल्लीमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 101.19 रुपये आणि डिझेलची किंमत 88.62 रुपये प्रति लीटर आहे. जरी मागील काही दिवसांपासून अशी अपेक्षा होती की किंमती कमी केल्या जाऊ शकतात.
 
पेट्रोल-डिझेल जीएसटीमध्ये समाविष्ट होणार नाही
वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेच्या शुक्रवारी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. प्रसारमाध्यमांना संबोधित करताना अर्थमंत्र्यांनी पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याच्या कयासांना पूर्णविराम दिला. ते म्हणाले, “पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा विचार करण्याची ही योग्य वेळ नाही. महसुलाशी निगडित अनेक मुद्द्यांचा विचार करावा लागेल. बैठकीत यावर चर्चा झाली नाही.