1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 30 सप्टेंबर 2019 (10:41 IST)

आणखी एका बँकेवर रिझर्व्ह बँकेचे निर्बंध

bank news
आर्थिक नियमिततेचं कारण देत रिझर्व्ह बँकेने लक्ष्मी विलास बँकेवर आर्थिक निर्बंध लागू केले आहेत. बँकेच्या संचालकांविरुद्ध दिल्लीच्या आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार करण्यात आल्यानंतर दोन दिवसात रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली आहे.
 
चेन्नईत मुख्यालय असलेल्या 93 वर्षं जुन्या लक्ष्मी विलास बँकेच्या देशभरात 569 शाखा आहेत. निर्बंध जारी केल्याने नव्याने कर्ज देणे, लाभांश जाहीर करणं, शाखांचा विस्तार अशा प्रत्येक गोष्टीत बँकेवर मर्यादा आल्या आहेत.
 
आर्थिक संकटाशी सामना करण्याची कुवत नसणे, मोठ्या प्रमाणातील थकित कर्ज, अॅसेट क्वालिटीत झालेली घसरण या तीन मुख्य कारणांमुळे रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली आहे.