बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Updated : शुक्रवार, 21 जुलै 2017 (12:27 IST)

RIL 40वीं एजीएम रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला सुरूवात

- मुंबई- जिओचा नवा फोन 24 ऑगस्टपासून प्रीबुक करता येणार. मुकेश अंबानी यांची माहिती. प्रत्येक आठवड्याला पन्नास लाख फोन ग्राहकांसाठी उपलब्ध करणार असल्याची ग्वाही.
- जिओ फोन मोफत मिळणार, 1500 रुपयांचं सेक्युरिटी डिपॉझिट भरावं लागणार, तीन महिन्यानंतर पुर्ण रिफंड मिळणार, मुकेश अंबानी यांची माहिती.
- मुंबई- जिओ 4 जी वोल्ट फोनची इफेक्टीव्ह किंमत शून्य.
- मुंबई- जिओच्या फोनवर दोन दिवसांचा इंटरनेट प्लॅन मिळणार 24 रूपयांना. तर आठवड्यांचा प्लॅन मिळणार 54 रूपयांना.
- मुंबई- जिओ फोन टीव्ही केबलची किंमत असणार दर महिन्याला 309 रूपये.
- मुंबई- जिओच्या नव्या फोनमध्ये अनलिमिटेडे डेटा दिला जाणार, 153 रूपयात मिळणार डेटा.
- मुंबई- जिओच्या व्हॉईस कमांडिंग फोनमध्ये डिजीटल पेमेंट करण्यासाठी विविध फिचर.
- मुंबई- जिओच्या व्हॉईस कमांडिंग फिचरमध्ये 22 भाषांचा समावेश- आकाश अंबानी यांची माहिती.
- मुंबई : जिओकडून सर्वात स्वस्त फोनचा डमो सादर. तुमच्या बोलण्यावर मोबाइल देणार प्रश्नाची उत्तरं.
- रिलायन्सची एजीएम बैठक सुरु असून, रिलायन्सच्या शेअर्सच्या किंमतीमध्ये 4 टक्के वाढ झाली आहे.
- मुंबई- जिओचा 4 जी वोल्ट फोन सगळ्यांनाच परवडणारा.
- मुंबई- रिलायन्स जियोकडून 4 जी वोल्ट मोबाइल लाँच.
- मुंबई : देशात 50 करोड फिचर फोन आहेत. ज्यांना स्मार्टफोनचे फायदे घेता येत नाहीत- मुकेश अंबानी.
- भारतात 78 हजार कोटी फोन आहेत, 50 कोटी लोकांना स्मार्टफोन सुविधा मिळत नाहीत - मुकेश अंबानी.




- मोबाईल डाटा वापरात भारताने चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकलं आहे - मुकेश अंबानी.
- एका सेकंदाला 7 ग्राहक जिओशी जोडले गेले - मुकेश अंबानी.
- रिलायन्सचा निव्वळ नफा 30 हजार कोटी, 3 लाख 30 हजार कोटींची उलाढाला - मुकेश अंबानी.
- मुंबई - रिलायन्सच्या सर्वसाधारण सभेला सुरुवात, मुकेश अंबानींच्या भाषणादरम्यान धीरुभाई अंबानींचा उल्लेख झाल्याने सर्व भावूक.
 मुंबई : रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला सुरूवात.