1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 18 फेब्रुवारी 2024 (14:41 IST)

केंद्र सरकारने देशातील कांदा निर्यातीवरील बंदी हटवली

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी हटवली आहे. केंद्र सरकार ने देशातील वाढत्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी  त्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. त्यासाठी 31 मार्च 2024 अंतिम मुदत दिली असून बंदी काढण्यात आली असून  गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षेतेखालील समितीने कांदा निर्यातीला मंजुरी दिली आहे.  

गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षततेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीया यांनी शेकऱ्यांच्या स्थितीची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिली असून गुजरात आणि महाराष्ट्रातील कांद्याचा स्टॉक बघता सरकार कडून बंदी हटवली असून निर्यातीला परवानगी देण्यात आली.पूर्वी कांदा 100 रुपये प्रति किलोच्या भावाने विकला जात होता. नंतर सरकारने प्रयत्न केल्यावर किमती कमी झाल्या.  
आता कांद्याची किंमत कोसळल्याने निर्यात बंदीचा निर्णय मागे घेतला असून आता तीन लाख मेट्रिक टन कांदा निर्यातीला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच बांग्लादेश मध्ये 50 हजार टन कांद्याची निर्यातीला परवानगी दिली आहे. 

Edited By- Priya Dixit