गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 फेब्रुवारी 2019 (09:35 IST)

शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या तारण मुक्त कर्जाची मर्यादा रिझर्व्ह बँकेने वाढवली

शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या तारण मुक्त कर्जाची मर्यादा रिझर्व्ह बँकेने १ लाख रुपयांवरून १ लाख ६० हजार रुपये करण्याचा निर्णय घेतला. आज रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी जाहीर याबाबत तशी घोषणा केली. ते आज रिझर्व्ह बँकेच्या सहाव्या द्वैमासिक पतधोरणाच्या निमित्ताने पत्रकार परिषदेत बोलत होते. छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांना हा पत पुरवठा होणार असून त्याचा फायदा होणार आहे.बँकेनं स्थापन केलेल्या अधिकाऱ्यांच्या समितीनं शिफारस केली होती. त्याआधारेच मर्यादा साठ हजार रुपयांनी वाढवली. दरम्यान, रिझर्व्ह बँकेचे द्वैमासिक पतधोरण जाहीर झाले आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात पाव टक्क्यांची कपात केली आहे. या निर्णयामुळे गृह कर्ज, वाहन कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे.