बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 7 जुलै 2020 (19:59 IST)

३०० युनिटसच्या आत वापर असणा-या घरगुती वीज ग्राहकांची देयके माफ करा

दरमहा ३०० युनिटसच्या आत वीज वापर असणा-या राज्यातील सर्व घरगुती वीज ग्राहकांची मागील तीन महिन्यांची देयके माफ करावीत, अशी मागणी करण्यात आल्याची माहिती वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी दिली. यासाठी १३ जुलै रोजी जिल्हा व तालुका पातळीवर राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे, असेही होगाडे यांनी सांगितले. (Three months' payments should be waived) वीज बिलांची होळी करण्यासह विविध मार्गांनी सरकारचे लक्ष या मागणीकडे वेधून घेण्याबरोबरच जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्या मार्फत सरकारला निवेदने ही देण्यात येणार आहेत.
 
लॉकडाऊनला १०० दिवस लोटले आहेत. या काळात अनेकांचा रोजगार गेला असून, अनेकांची दमछाक झाली आहे. परिणामी या माध्यमातून तरी दिलासा देण्यात यावा. लॉकडाऊनच्या काळात स्वस्त व काही प्रमाणात दिलेले मोफत धान्य वगळता सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत जनतेला झालेली नाही. मोदी सरकारने जाहीर केलेल्या तथाकथित २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजमधून (Three months' payments should be waived) गरीबांच्या ताटातील कोरड्या भाकरीवर चमच्याभर तेलही पडलेले नाही.  एकीकडे ही स्थिती असताना महावितरण, बेस्ट तसेच अदानी, टाटा पॉवर या सारख्या वीज कंपन्यांनी मागील तीन ते चार महिन्यांची वीज देयके ग्राहकांना पाठविली असून ती भरण्यासाठी तगादा लावायला सुरुवात केली आहे. त्यामुळे राज्यभरातील जनतेस प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. १ एप्रिलपासून लागू झालेल्या दरवाढी बाबतही लोकांच्या मनात नाराजी आहे.