गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

रेशन धान्य दुकानावर तूर डाळ मिळणार

यापुढे रेशन धान्य दुकानावर तूर डाळ उपलब्ध होणार आहे. राज्याच्या मंत्रीमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ही तूर मोठ्या बाजारात मिळणाऱ्या भावापेक्षा कमी दराने म्हणजे 55 रुपये किलो दराने उपलब्ध होणार आहे.
 
गेल्या वर्षी अतिरिक्त तुरीचे उत्पादन राज्यात झालं. नाफेड बरोबर राज्याने 26 लाख क्विंटल तूर विकत घेतली. 26 लाख क्विंटल तूर डाळीपैकी भुसा आणि टरफलं (चुरा) यामुळे प्रत्यक्षात 17 – 18 लाख क्विंटल तूर उपलब्ध होणार आहे. यामध्ये 7 लाख क्विंटल तूर ही राज्याच्या विविध पोषण आहारातून वितरित केली जाईल. तर उर्वरित सुमारे 10 लाख क्विंटल तूर ही रेशन धान्य दुकानावर उपलब्ध होणार आहे.